Mother's Day 2023 Date: मदर्स डे (Mother's Day 2023) दरवर्षी मे महिन्याच्या दुसऱ्या रविवारी साजरा केला जातो. एप्रिल महिना संपत आला आहे, अशा स्थितीत बहुतेक जण या वर्षी मदर्स डे येण्याची वाट पाहत आहेत. यंदा 14 मे रोजी मदर्स डे साजरा केला जाणार आहे. हा दिवस आईला समर्पित आहे. एक आई आपल्या मुलांच्या उज्वल भविष्यासाठी रात्रंदिवस परिश्रम करत असते.
आईच्या या समर्पण आणि बलिदानाचा गौरव करण्यासाठी दरवर्षी मातृदिनाचे महत्त्व साजरे केले जाते. हा दिवस आईसाठी खास बनवण्यासाठी मुलं अनेक दिवस आधीच तयारी करायला लागतात. मदर्स डे सेलिब्रेशनची सुरुवात कशी झाली आणि तो मे महिन्याच्या दुसऱ्या रविवारीच का साजरा केला जातो? याबाद्दल आज आम्ही तुम्हाला या लेखातून माहिती देणार आहोत. (हेही वाचा - Happy Mother's Day Wishes: मदर्स डे च्या शुभेच्छा देण्यासाठी Facebook Messages, WhatsApp Status शेअर करत व्यक्त करा कृतज्ञता!)
मातृदिनाची सुरुवात कशी झाली?
मदर्स डे साजरा करण्याची सुरुवात अमेरिकेत झाली. अॅना जार्विस नावाच्या अमेरिकन महिलेचे तिच्या आईवर खूप प्रेम होते. तिने स्वतः आईची काळजी घेण्यासाठी लग्न केले नाही. पण जेव्हा तिची आई वारली तेव्हा अॅनाला आईची खूप आठवण यायची. आई आपल्या मुलांसाठी आयुष्यभर किती करते, पण तिच्या त्याग आणि समर्पणाला दादही दिली जात नाही, असा अॅना अनेकदा विचार करत असे. अशा परिस्थितीत, असा दिवस असावा की ज्या दिवशी मुले त्यांच्या निस्वार्थ प्रेम, त्याग आणि समर्पणाबद्दल त्यांच्या आईचे आभार मानू शकतात. अॅनाच्या आईचे मे महिन्यात निधन झाले, त्यामुळे अॅनाने आपल्या आईची पुण्यतिथी ‘मदर्स डे’ म्हणून साजरी करण्यास सुरुवात केली.
अॅनाने तिच्या आईच्या मृत्यूनंतर तिचे संपूर्ण आयुष्य इतरांच्या सेवेसाठी समर्पित केले. दुसऱ्या महायुद्धात अॅनाने जखमी अमेरिकन सैनिकांचीही आईप्रमाणे सेवा केली. त्यांच्या सेवेच्या भावनेचा सन्मान करण्यासाठी अमेरिकेचे तत्कालीन राष्ट्राध्यक्ष वुड्रो विल्सन यांनी अॅनाच्या सन्मानार्थ कायदा केला आणि मदर्स डे साजरा करण्यास थेट मान्यता दिली. अमेरिकन संसदेत एक कायदा करून, हा दिवस मे महिन्याच्या दुसऱ्या रविवारी साजरा करण्याची घोषणा करण्यात आली आणि 9 मे 1914 रोजी पहिला मातृदिन औपचारिकपणे साजरा करण्यात आला.
तेव्हापासून दरवर्षी हा दिवस मे महिन्याच्या दुसऱ्या रविवारी साजरा केला जातो. पूर्वी हा दिवस फक्त अमेरिकेत साजरा केला जात होता, परंतु आता तो युरोप, भारत इत्यादी इतर अनेक देशांमध्ये साजरा केला जातो.