Happy Mother's Day 2022 Wishes: मदर्स डे च्या शुभेच्छा देण्यासाठी Facebook Messages, WhatsApp Status शेअर करत व्यक्त करा कृतज्ञता!
जगभरात मे महिन्याच्या दुसर्या रविवारी 'मदर्स डे' साजरा केला जातो. पण भारतामध्ये या दिवसाच्या बरोबरीने श्रावण अमावस्येच्या म्हणजेच 'पिठोरी अमावस्या' (Pithori Amavasya) दिवशी मातृदिन (Matru Din) साजरा करण्याची पद्धत आहे.
मे महिन्यातील दुसरा रविवार हा मदर्स डे (Mother's Day) म्हणून साजरा केला जातो. यंदा हा मदर्स डे 8 मे 2022 दिवशी जगभरात साजरा केला जाणार आहे. या दिवसाचं औचित्य साधत आईसाठी एक दिवस समर्पित केला जातो. आई भोवती प्रत्येकाचंच आयुष्य फिरत असतं पण हा एक खास दिवस तिच्याप्रति कृतज्ञता विविध माध्यमातून व्यक्त केली जाते. मग तुम्ही देखील तुमच्या आई सोबतच जगात मातृत्त्व अनुभवणार्या प्रत्येक स्त्रीला सलाम करण्यासाठी काही शुभेच्छापत्र सोशल मीडीयात Facebook Messages, WhatsApp Status, Wishes, HD Images, Quotes द्वारा शेअर करू शकता.
जगभरात मे महिन्याच्या दुसर्या रविवारी 'मदर्स डे' साजरा केला जातो. पण भारतामध्ये या दिवसाच्या बरोबरीने श्रावण अमावस्येच्या म्हणजेच 'पिठोरी अमावस्या' (Pithori Amavasya) दिवशी मातृदिन (Matru Din) साजरा करण्याची पद्धत आहे. हे देखील नक्की वाचा: Mother's Day Gift Ideas 2022:डिनर डेटपासून ते एकत्र टॅटू काढण्यापर्यंत, साजरे करा हटके मदर्स डे.
मदर्स डे च्या शुभेच्छा

घरं सुटतं पण आठवण कधी सुटत नाही
जीवनात आई नावाचं पान कधीही मिटत नाही
हॅप्पी मदर्स डे!

देवाच्या मंदिरात
एकच प्रार्थना करा,
सुखी ठेव तिला,
जिने जन्म दिलाय मला
Happy Mother’s Day

ठेच लागता पायी, वेदना होती तिच्या हृदयी
33 कोटी देवांमध्ये, श्रेष्ठ आहे मला माझी आई
हॅप्पी मदर्स डे!

आत्मा आणि ईश्वर यांचा संगम असलेल्या
जगातील प्रत्येक 'आईला'
Happy Mother’s Day

व्यापता न येणारं अस्तित्व
आणि मापता न येणारं प्रेम म्हणजे मातृत्व
हॅप्पी मदर्स डे!
आजही भारतीय संस्कृतीमध्ये आई जी जन्माची शिदोरी, ती उरत ही नाही आणि पुरत ही नाही अशीच आहे. तिच्या ऋणांमधून कधीच उतराई होऊ शकत नाही म्हणून आजच्या दिवशी आपल्याला या जगात घेऊन येणार्या त्या माऊलीला आपल्या कृतीमधून कृतज्ञता, आदर व्यक्त करून तिचे आशिर्वाद घ्या. या निमित्ताने तुम्ही तिला गिफ्ट्स देऊ शकता. तिच्या आवडीचे पदार्थ बनवून तिला खाऊ घालू शकता.
(The above story first appeared on LatestLY on May 07, 2022 08:01 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

