हिंदू दिनदर्शिकेनुसार प्रत्येक चंद्रोदयाच्यावेळी चर्तुर्थी येते. त्यामुळे हिंदू धर्मग्रथांनुसार चतुर्थी तिथीला श्रीगणेशाची पूजा केली जाते. अमावस्या नंतर येणाऱ्या शुल्क पक्ष चतुर्थीला विनायक चतुर्थी (Vinayak Chaturthi) म्हणतात. त्याचसोबत पौर्णिमेनंतर येणाऱ्या कृष्ण पक्ष चतुर्थीला संकष्टी चतुर्थी (Sankashti Chaturthi) असे म्हटले जाते.
विनायक चतुर्थीचे व्रत प्रत्येक महिन्यात करावे लागते. मात्र भाद्रपद महिन्यात येणाऱ्या विनायक चतुर्थीला फार महत्व असते. भाद्रपद महिन्यात येणाऱ्या चतुर्थीला गणेश चतुर्थी नावाने ओळखली जाते. संपूर्ण जगात गणेश चतुर्थी दिवशी गणपतीचा जन्म झाल्याच्या आनंदात मोठ्या उत्साहात विविध कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. तर विनायक चतुर्थी दिवशी या पद्धतीने गणेशाची पूजा केल्यास आयुष्यात भरपूर सुख-समृद्धी तुम्हाला प्राप्त होईल.
-गणेशाची पूजा करताना गणेशस्तोत्र किंवा पठण करावे.
-गणपतीला मोदकांचा नैवेद्य, जास्वंद आणि दुर्वा अर्पण कराव्यात.
-या दिवशी कोणाबद्दल ही वाईट विचार करु नये.
-विनायक चतुर्थीला सौभाग्यवती महिलांनी उपवास ठेवावा.
-चतुर्थीला गणपतीची मनोकामे पूजा करुन तुमच्या मनातील इच्छा त्याच्या समोर व्यक्त केल्यास त्या पूर्ण होतात.
तर 6 जुलै रोजी साजरा करण्यात येणाऱ्या विनायक चतुर्थीसाठी गणपतीची पूजा करण्यासाठी सकाळी 11.03 ते 1.10 पर्यंत शुभमुहूर्त आहे. विनायक चतुर्थीचा उपवास केल्यास श्रीगणेश त्या व्यक्तीला भरपूर ज्ञान आणि आयुष्यात सुख-समुद्धी मिळवण्यासाठी नेहमी पाठीशी उभा राहतो.