
वटपौर्णिमेचा (Vat Purnima) सण हा सवाष्ण स्त्रियांसाठी खास दिवस असतो. पतीच्या दीर्घायुष्यासाठी अनेक जणी या दिवशी उपवास ठेवतात. वडाच्या झाडाला दोरा बांधून साता जन्मासाठी हाच पती मिळावा म्हणून प्रार्थना करतात. आता हळूहळू स्त्रिया करियर, कामधंद्याच्या मागे व्यस्त झाल्याने वटापौर्णिमा साजरी करण्याची पद्धत बदलली आहे. यंदा वटपौर्णिमेचा सण 3 जून दिवशी साजरा केला जाणार आहे. मग या मंगलमय दिवसाच्या शुभेच्छा WhatsApp Status, Wishes,Facebook Messages, HD Images द्वारा शेअर करून पती-पत्नी एकमेकांना किंवा तुम्ही तुमच्या सख्यांसोबत हा सण साजरा करू शकता.
वटपौर्णिमा हा सण हिंदू कॅलेंडरनुसार, ज्येष्ठ शुद्ध पौर्णिमेच्या दिवशी साजरा केला जातो. या दिवशी पतीच्या दीर्घायुष्यासाठी व्रत पाळलं जातं. सत्यवान सावित्रीच्या पुराणात सांगितलेल्या कथेनुसार, प्रत्येक पत्नी आपल्या पतीला दीर्घायुष्य मिळावं म्हणून प्रार्थना करत असते. तसेच एकामेकांची साथ देखील साताजन्म अबाधित रहावी म्हणून प्रार्थना करते. नक्की वाचा: Vat Purnima 2023 Date and Time: वट पौर्णिमा कधी आहे? शुभ मुहूर्त, पूजाविधी आणि महत्त्व जाणून घ्या .
वटपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा

लग्नाच्या पवित्र नात्याने बांधली गेली जन्माची गाठ
अशीच कायम राहो आपली दृढ साथ …
वटपौर्णिमेच्या खूप शुभेच्छा

वटपौर्णिमेचा दिवस हा खास…
लागून राहिली आहे साता जन्माची आस!
वटपौर्णिमेच्या खास शुभेच्छा

सण हा सौभाग्याचा,
सुखाचा आणि भाग्याचा…
वटपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा!

सप्तपदींच्या सात फेर्यांनी बांधलं हे प्रेमाचं बंधन,
जन्मोजन्मी राहो असेच कायम,
नजर न लागो या संसाराला,
दरवर्षी अशीच येवो ही वटपौर्णिमेची घडी कायम
वटपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा!

दोन क्षणाचे भांडण
सात जन्माचे बंधन
लाभून तुमची साथ झाले मी पावन
नेहमी आनंदी राहो आपले सहजीवन
वटपौर्णिमेच्या खूप खूप शुभेच्छा!

वटपौर्णिमेच्या शुभेच्छा
आजकाल अनेक पती देखील आपल्या पत्नीला साथ म्हणून वटपौर्णिमेचं व्रत करतात. या सणाच्या निमित्ताने एकमेकांमधील जिव्हाळा वाढावा म्हणून प्रयत्न केले जातात. पर्यावरणाचा विचार करता वड हे ऑक्सिजनचा पुरवठा करणारं महत्त्वाचं झाडं आहे. त्यामुळे शक्य असल्यास वडाच्या झाडांना जपा, त्यांच्या जवळ स्वतः जाऊन हे व्रत करा. वेळ नाही म्हणून वडाच्या झाडाच्या फांद्यांची तोडणी करून पूजा करणं टाळा.