Vat Purnima 2023 Date and Time: वट पौर्णिमा कधी आहे? शुभ मुहूर्त, पूजाविधी आणि महत्त्व जाणून घ्या
Vat Purnima 2023 (PC - File Image)
Vat Purnima 2023 Date and Time: वट सावित्रीचे व्रत यूपी, गुजरात, महाराष्ट्र, बिहार, दिल्ली, हरियाणा अशा अनेक राज्यांमध्ये ठेवले जाते. हिंदू धर्मात वट सावित्री व्रताचे विशेष महत्त्व आहे. असे मानले जाते की हे व्रत पाळल्याने पतीला दीर्घायुष्य मिळते. या व्रताची कथा सावित्री आणि सत्यवान यांच्याशी संबंधित आहे. असे म्हणतात की ज्येष्ठ पौर्णिमेच्या दिवशी सावित्रीने यमराजापासून आपला पती सत्यवान यांना जिवंत केले.

 

वट सावित्रीचे व्रत जेष्ठ महिन्यात दोनदा येते, एकदा ज्येष्ठ अमावस्येला आणि दुसरी जेष्ठ पौर्णिमेला. ज्येष्ठ अमावस्या वट सावित्री व्रत 19 मे रोजी साजरी करण्यात आली, आता ज्येष्ठ पौर्णिमा वट सावित्री व्रत 3 जून रोजी साजरी केली जाणार आहे. यावर्षी ज्येष्ठ मासातील शुक्ल पक्षाची पौर्णिमा 3 जून रोजी सकाळी 11.16 वाजता सुरू होईल आणि 4 जून 2023 रोजी सकाळी 9.11 वाजता समाप्त होईल. अशा स्थितीत पौर्णिमेला वट सावित्री व्रत शनिवार, 3 जून रोजी ठेवण्यात येणार आहे. (हेही वाचा - Happy Brother’s Day 2023 Wishes: ब्रदर्स डे च्या निमित्ताने Messages, WhatsApp Stickers, Facebook Greetings, Images, SMS च्या माध्यमातून भावाला द्या खास शुभेच्छा!)

यावर्षी वट सावित्री पौर्णिमा व्रत अतिशय शुभ योगात येत आहे. वट सावित्री व्रताच्या पौर्णिमेच्या दिवशी शिवयोग होईल. या योगात शुभ कार्य आणि पूजा केल्याने व्यक्तीच्या सर्व मनोकामना पूर्ण होतात असे सांगितले जाते.

वट सावित्री पौर्णिमा व्रत प्रामुख्याने गुजरात, महाराष्ट्र आणि दक्षिण भारतात पाळले जाते, तर उत्तर भारतात वट सावित्री व्रत ज्येष्ठ अमावस्येला पाळले जाते. या दोन्ही व्रतांच्या उपासना पद्धतीपासून ते व्रताच्या कथेपर्यंत सर्व काही सारखेच आहे.