Vat Purnima 2022 Messages: वट पौर्णिमाचे व्रत वट सावित्री व्रतानंतर 15 व्या दिवशी येते. वट सावित्री व्रत हे ज्येष्ठ अमावस्येला ठेवले जाते. जे उत्तर भारतातील विवाहित स्त्रिया पाळतात. तर वट पौर्णिमा व्रत महाराष्ट्र, गुजरातसह दक्षिण भारतातील राज्यांमध्ये ठेवले जाते. यंदा वट पौर्णिमा व्रत 14 जून रोजी ठेवण्यात येणार आहे. या दिवशी सकाळपासून प्राप्य योग तयार होत आहे, जो सकाळी 9.40 पर्यंत राहील. पंचांगानुसार, साध्या योगानंतर शुभ योग सुरू होईल. हे दोन्ही योग शुभ कामांसाठी खूप चांगले मानले जातात. वटपौर्णिमेच्या दिवशी सकाळी उपवास केला जातो.
वटपौर्णिमेच्या दिवशी Wishes, Images, WhatsApp Status, Greeting द्वारे सुवासिनी एकमेकींना खास शुभेच्छा देत असतात. वटपौर्णिनिमित्त तुम्ही देखील आपल्या मैत्रिणींना खास मराठी शुभेच्छा देऊ शकता. यासाठी तुम्ही खालील ईमेज डाऊनलोड करू शकता. (हेही वाचा -Vat Purnima 2022: वट पौर्णिमेची तारीख आणि शुभ मुहूर्त, या मुहुर्तामध्ये पूजा केल्यास तुमच्या पतीला लाभेल दीर्घ आयुष्य, जाणून घ्या)
वटसावित्री पूजेच्या हार्दिक शुभेच्छा!
हाच जन्म नव्हे तर प्रत्येक जन्मी तुम्हाला
तुमच्या मनासारखा जोडीदार मिळावा हीच सदिच्छा!
कुंकवाचा साज असाच कायम राहू द्या,
धन्याला मिळू द्या दीर्घायुष्य..
वटपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा!
सण सौभाग्यचा.. बंध अतूट नात्याचा
या मंगलदिनी पूर्ण होवोत तुमच्या सर्व इच्छा
वटपौर्णिमा सणाच्या मनःपूर्वक शुभेच्छा!
या वडाच्या झाडाइतका दीर्घायुषी असावास तू,
जन्मोजन्मी माझा आणि माझाच असावास तू…
वटसावित्रीच्या हार्दिक शुभेच्छा!
दोन क्षणाचे असते भांडण
सात जन्माचे असते बंधन
कितीही आले जरी संकट
नेहमी आनंदी राहो आपले सहजीवन
वटपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा!
वटपौर्णिमा व्रताच्या पूजेच्या वेळी कथा सांगितली जाते. वट पौर्णिमा व्रताची कथा वट सावित्री व्रताच्या कथेसारखीचं आहे. यात काही फरक नाही. वट पौर्णिमा व्रत आणि वट सावित्री व्रत यामध्ये फक्त तिथींचा फरक आहे. स्थळ आणि प्रदेशानुसार उपवास आणि उपासना पद्धतीत किरकोळ बदल आहेत.
----------