Vat Purnima (Photo Credits-Facebook)

Vat Purnima 2021 Puja Muhurat: हिंदू पंचांगानुसार प्रत्येक वर्षी जेष्ठ मास कृष्ण पक्षाच्या अमावस्येच्या तिथी दिवशी वट सावित्री व्रत किंवा काही ठिकाणी जेष्ठ पौर्णिमेच्या दिवशी वट पौर्णिमेचे व्रत करण्याची परंपरा आहे. विवाहित महिला आपल्या पतीच्या दीर्घायुष्यासाठी हे व्रत करतात. बहुतांश ठिकाणी हे व्रत जेष्ठ अमावस्येच्या दिवशी ते जेष्ठ पौर्णिमेच्या तिथी पर्यंत केले जाते. असे सांगितले जाते की, वटवृक्षाची पूजा करुन सावित्रीने आपला पती सत्यवान यांचा प्राणाची रक्षा केली होती. यासाठीच नवऱ्याच्या दीर्घायुष्यासाठी हे व्रत करणे महत्वाचे मानले जाते. अशी मान्यता आहे की, या व्रताच्या प्रभावामुळे महिलांना पतीच्या दीर्घायुष्यासह सुखी वैवाहिक जीवन लाभते. तर जाणून घ्या यंदाच्या वर्षी वटपौर्णिमेची पूजा कशी करावी. त्याचसोबत त्यासाठी लागणारे पूजा, साहित्य, विधी, शुभ मूहर्ताबद्दल अधिक.

ज्येष्ठ पौर्णिमेला विवाहित महिला हे व्रत करतात. हे तीन दिवसाचे व्रत असते. या व्रताची सुरुवात  पौर्णिमेच्या आधी दोन दिवस करण्यात येते. तर शक्य नसल्यास केवळ पोर्णिमेला व्रत करुन पूजा करावी. दिवसभर उपवास करून यादिवशी रात्री हा उपवास सोडावा. हे तिन्ही दिवस अगदी षोडशोपचार पद्धतीने वडाची पूजा करावी असे सांगितले जाते. (Vat Purnima 2021 Mehndi Designs: वटपौर्णिमेच्या खास दिवशी हातावर काढा 'या' सोप्या आणि सुंदर मेहंदी डिझाईन्स)

वट पौर्णिमेच्या पूजेसाठी लागणारे साहित्य-

सावित्री आणि सत्यवानाची मूर्ती,धूप- दीप-उदबत्ती, तूप,पाच प्रकारची फळं,फुले,दिवा,वडाला गुंडाळण्यासाठी पांढरा मोठा धागा,पाणी भरलेला लहान कलश,हळद - कुंकू,पंचामृत,हिरव्या बांगड्या,शेंदूर,एक गळसरी,अत्तर,कापूर,पूजेचे वस्त्र,विड्याचे पाने,सुपारी,पैसे,गूळ खोबऱ्याचा नैवेद्य,आंबे,दूर्वा,गहू

वट पौर्णिमा व्रत शुभ मुहूर्त-

-वट पौर्णिमा व्रत: 24 जून 2021

-पौर्णिमा तिथी प्रारंभ: 24 जून सकाळी 03.32 वाजता

-पौर्णिमा तिथी समाप्ती: 25 जून सकाळी 12.09 वाजता

जेष्ठ पौर्णिमेच्या दिवशी व्रत ठेवणाऱ्या महिलांनी सकाळी लवकर उठून स्ना करण्यानंतर व्रताला सुरुवात करावी. वट सावित्री व्रताप्रमाणेच या दिवशी 16 श्रृंगार करावे. त्यानंतर वट वृक्षाची पूजा करावी. वडाला फुले, वाण, पाणी देत सात फेरे त्याभोवती मारावे. त्यावेळी पतीच्या दीर्घायुष्यासाठी प्रार्थना करावी.