Mehndi Designs (Photo Credit : Instagram & YouTube )

हिंदू पंचांगातील ज्येष्ठ महिन्यात येणारी पौर्णिमा हा दिवस "वटपौर्णिमा" म्हणून साजरा केला जातो. ह्या दिवशी स्त्रिया वटपौर्णिमा नावाचे व्रत करतात. या व्रतादरम्यान विवाहित स्त्रिया आपल्या पतीला उत्तम आरोग्य लाभावे, दीर्घायुष्य प्राप्त व्हावे म्हणून वडाच्या झाडाची पूजा करतात.ज्येष्ठ शुद्ध त्रयोदशी पासून पौर्णिमेपर्यंत हे त्रिरात्र व्रत करावे असे सांगितले जाते. तीन दिवस उपवास करणे सगळ्याच स्त्रियांना करणे शक्य नसल्यामुळे केवळ पौर्णिमेलाच उपवास केला जातो. या दिवशी स्त्रिया नटुन- थटून वडाची पूजा करायला जातात. या साज -श्रृंगारात मेहंदीचे ही मोठे स्थान असते. (Vat Purnima 2020 Rangoli Design: वटपौर्णिमा सणानिमित्त 'या' खास रांगोळी डिझाईन्स काढून वाढवा तुमच्या अंगणाची शोभा! )

अनेक स्त्रिया या दिवशी हातावर मेहंदी काढतात.यंदा वटपौर्णिमा 24 जून रोजी साजरी करण्यात येणार आहे. त्यामुळे तुम्ही ही हातावर मेहंदी काढण्याच्या विचारात असाल आणि मेहंदी डिझाईन्सच्या शोधात असाल  तर आज आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत वटपौर्णिमेसाठी हातावर काढता येतील अशा सोप्या आणि सुंदर मेहंदी डिझाईन्स.

वट सावित्री स्पेशल अरेबिक मेहंदी

वट सावित्री ज्वेलरी मेहंदी डिझाईन    

वट सावित्री पूजा स्पेशल मेहंदी डिझाईन 

वट सावित्री विशेष 'वड' मेहंदी 

वट सावित्री फूल हैंड मेहंदी 

वट सावित्री स्पेशल सोप्या मेहंदी डिझाईन 

सर्व पवित्र वृक्षांमध्ये वटवृक्षाचे आयुष्य जास्त असून पारंब्यांनी त्याचा विस्तारही खूप होतो. अशा वटवृक्षाची पूजा करून स्त्रिया 'मला व माझ्या पतीला आरोग्यसंपन्न दीर्घायुष्य लाभू दे,धनधान्य व मुले-नातू यांनी माझा प्रपंच विस्तारित व संपन्न होऊ दे', अशी प्रार्थना करतात.