Vat Purnima 2020 Rangoli Design: वटपौर्णिमा सणानिमित्त 'या' खास रांगोळी डिझाईन्स काढून वाढवा तुमच्या अंगणाची शोभा!
वटपौर्णिमा रांगोळी डिझाई्न्स (PC - You Tube)

Vat Purnima 2020 Rangoli Design: उद्या म्हणजेच हिंदू पंचांगातील ज्येष्ठ महिन्यात येणाऱ्या पौर्णिमेला वटपौर्णिमेचा सण साजरा केला जातो. विवाहित महिलांसाठी हा सण अत्यंत महत्त्वाचा असतो. या दिवशी स्त्रिया वडाच्या झाडाची पुजा करतात आणि आपल्या पतीला उत्तम आरोग्य लाभावे, दीर्घायुष्य प्राप्त व्हावे म्हणून प्रार्थना करतात.

वटपौर्णिमेच्या दिवशी विवाहित स्त्रिया साज शृंगार करतात. या दिवशी काही स्त्रिया सलग तीन दिवस उपवास करतात. तर काही स्त्रिया वटपौर्णिनेच्या दिवशी उपवास करतात. या दिवशी दान धर्म करण्याला अत्यंत महत्त्व असतं. या दिवशी स्त्रिया आपल्या अंगणात सुरेख अशी रांगोळी काढतात. बदलत्या ट्रेन्डनुसार, रांगोळीत सणाची प्रतिमा साकारली जाते. म्हणजेचं तुम्ही या दिवशी खास वडाचं झाडं असणारी रांगोळी काढू शकता. त्यामुळे तुमचं अंगण अधिक सुशोभित दिसेल. खालील व्हिडिओज पाहून तुम्ही तुमच्या अंगणाची शोभा नक्की वाढवू शकता. यासाठी तुम्हाला खालील व्हिडिओज नक्की उपयोगात येतील. (हेही वाचा - Vat Purnima Vrat 2020: 5 जून ला साजरी होणार वटपौर्णिमा; जाणून घ्या शुभ मुहूर्त आणि पूजाविधी)

पर्यावरणशास्त्राच्या दृष्टीने वडाचे विशेष महत्त्व आहे. त्यामुळे त्यांच्या विषयी कृतज्ञता व्यक्त करणे, हादेखील वटपौर्णिमेच्या दिवशी पूजा करण्यामागचा एक हेतू आहे. वटपौर्णिमेच्या दिवशी सुवासिनी वटवृक्षाची पूजा करून 'मला व माझ्या पतीला आरोग्यसंपन्न दीर्घायुष्य लाभू दे, धनधान्य व मुले-नातू यांनी माझा प्रपंच विस्तारित व संपन्न होऊ दे', अशी प्रार्थना करतात.