Vat Purnima Vrat 2020: 5 जून ला साजरी होणार वटपौर्णिमा; जाणून घ्या शुभ मुहूर्त आणि पूजाविधी
Vat Purnima 2020 (संग्रहित-संपादित प्रतिमा)

Vat Purnima Vrat 2020: हिंदू पंचांगातील ज्येष्ठ महिन्यात येणारी पौर्णिमा (Purnima) हा दिवस 'वटपौर्णिमा' म्हणून साजरा केला जातो. उद्या म्हणजेचं शुक्रवारी 5 जून रोजी वटपौर्णिमेचा सण साजरा होणार आहे. या दिवशी विवाहित स्त्रिया वटपौर्णिमेचे व्रत करतात. या व्रतादरम्यान स्त्रिया आपल्या पतीला उत्तम आरोग्य लाभावे, दीर्घायुष्य प्राप्त व्हावे म्हणून वडाच्या झाडाची पूजा करतात.

पौराणिक कथेनुसार, ज्येष्ठ शुद्ध त्रयोदशी पासून पौर्णिमेपर्यंत हे त्रिरात्र व्रत करावे. तीन दिवस उपवास करणे अशक्य असेल त्यांनी फक्त पौर्णिमेलाच उपवास करावा. सावित्रीसह ब्रह्मदेवदेखील या व्रताची मुख्य देवता आहे. तर सत्यवान-सावित्री, नारद व यमधर्म या उपांग देवता आहेत. (हेही वाचा - Vat Purnima 2020 Mehndi Designs: वटपौर्णिमा सणा निमित्त 'या' झटपट मेहंदी डिझाईन्स काढून वाढवा आपल्या हाताचे सौंदर्य! (Watch Video))

वटपौर्णिमा शुभ मुहूर्त -

5 जून पहाटे 03:15 ते 6 जून पहाटे 12:41 AM

वटपौर्णिमा पूजा साहित्य -

हिरव्या बांगड्या, शेंदूर, एक गळसरी (काळी पोत), अत्तर, कापूर, पंचामृत, पूजेचे वस्त्र, विड्याचे पाने, सुपारी, पैसे, गूळ खोबऱ्याचा नैवेद्य, आंबे, दूर्वा, गहू, सती मातेचा फोटो किंवा सुपारी इ. (वाचा -Happy Vat Purnima 2020 Messages: वटपौणिमा मराठी शुभेच्छा संदेश, Wishes, Greetings, Images, Whatsapp Status, Facebook वर शेअर करत साजरा करा वटसावित्री व्रताचा खास दिवस!)

वटपौर्णिमा पूजाविधी -

 • या दिवशी विवाहित स्त्रियांनी उपवास करावा.
 • प्रथम सौभाग्यवती स्त्रीने ‘मला आणि माझ्या पतीला आरोग्यसंपन्न दीर्घायुष्य लाभो’, असा संकल्प करावा.
 • प्रथम सुपारीच्या गणपतीची स्थापना करावी.
 • गणपतीची हळद कुंकू अक्षता वाहून पूजा करावी.
 • त्यानंतर सती मातेच्या सुपारीची पूजन करावे.
 • सती मातेला हळदी-कुंकू, काली पोत, हिरव्या बांगड्या हे सौभाग्य अलंकार अर्पण करावे.
 • वडाचे मुळाजवळ अभिषेक करून पूजन व आरती करावी.
 • वडाला हळद कुंकू वाहून आंबे आणि दूध साखरेचा नैवेद्य दाखवावा.
 • वडाच्या झाडाला तिहेरी सुती दोरा गुंडाळून पाच प्रदक्षिणा घालाव्या.
 • वडाला प्रदक्षिणा घालताना खालील मंत्र म्हणावा -

  सावित्री ब्रम्हा वादिनी सर्वदा प्रिय भाषिणी।

  तेन सत्येनमां पाहि दुःखसंसार सागरात।।

  अवियोगि यथा देव सवित्र्या सहीतस्य ते।

  अवियोग तथास्माकं भूयात् जन्म जन्मनि।।

प्रदक्षिणा पूर्ण झाल्यानंतर सुवासिनींची आंबे व गव्हाने ओटी भरावी. सायंकाळी सुवासिनी सह सावित्रीच्या कथेचे वाचन करावे आणि 'मला व माझ्या पतीला आरोग्यसंपन्न दीर्घायुष्य लाभू दे,' अशी प्रार्थना करावी. या दिवशी वडाच्या झाडाचे अनन्यसाधारण महत्त्व असते.