Vat Purnima 2020 Mehndi Designs: वटपौर्णिमा सणा निमित्त 'या' झटपट मेहंदी डिझाईन्स काढून वाढवा आपल्या हाताचे सौंदर्य! (Watch Video)
Representational Image (Photo Credits: unsplash.com)

Vat Purnima 2020 Mehndi Designs: विवाहित महिलांसाठी महत्त्वाचा असणारा वटपौर्णिमा (Vat Purnima Vrat) सण यंदा 5 जून रोजी साजरा होणार आहे. हिंदू पंचांगातील ज्येष्ठ महिन्यात येणाऱ्या पौर्णिमेच्या दिवशी सुवासिनी स्त्रिया 'वटपौर्णिमा' चा सण साजरा करतात. या व्रतादरम्यान विवाहित स्त्रिया आपल्या पतीला उत्तम आरोग्य लाभावे, दीर्घायुष्य प्राप्त व्हावे म्हणून वडाच्या झाडाची पूजा करतात. निसर्गतःच दीर्घायुषी असणाऱ्या वृक्षांचे संवर्धन आणि जतन व्हावे अशा हेतूने वड, पिंपळ अशा वृक्षांची पूजा करण्याची कल्पना पूर्वी असावी. त्यामुळे या दिवशी वडाची पूजा केली जाते.

विवाहित स्त्रिया वटपौर्णिमेच्या दिवशी सात जन्म तोच पती मिळण्यासाठी व्रत करतात. पौराणिक कथेनुसार, हे व्रत केल्यावर पतीला दिर्घ आयुष्य प्राप्त होते. तसेच पुढच्या सात जन्मासाठी त्या स्त्रिला तोच पती मिळतो. या दिवशी विवाहित स्त्रिया साज शृंगार करतात. वटपौर्णिमेच्या दिवशी स्त्रिया आपल्या हातावर मेहंदी काढतात. या दिवशी मेहंदीचे विशेष महत्त्व असते. त्यामुळे तुम्हीही वटपौर्णिमेनिमित्त खास आणि सोप्या मेहंदी डिझाईन्स काढणार असाल तर खालील व्हिडिओज तुमच्या नक्की उपयोगात येतील. (हेही वाचा - Vat Purnima Vrat 2020: वटपौर्णिमा यंदा 5 जून ला होणार साजरी; सुवासिनींसाठी खास अशा 'या' व्रताचे महत्त्व आणि मुहूर्त जाणून घ्या)

पौर्णिमेच्यादिवशी स्त्रिया नववस्त्र व अलंकार परिधान करून वट वृक्षाची पूजा करतात. तसेच हळदी-कुंकू, फुलं आणि या ऋतूतील फळांचा नैवेद्य दाखवतात आणि ‘अक्षय सौभाग्या’साठी प्रार्थना करतात. या दिवशी विवाहित स्त्रिया सौभाग्यवाण म्हणून खण, नारळ, फळं, बांगड्या अशा वस्तू दान करतात. या दिवशी स्त्रिया उपवास करून सत्यवान-सावित्रीची कथा वाचतात. या दिवशी अन्न-धान्य दानही केलं जातं.