Tulsi Vivah 2019 Rangoli Designs: अनेक वर्षांपूर्वी लिहिलेल्या एका ग्रंथात स्त्रियांना अवगत असाव्या अशा चौसष्ट कलांमध्ये रांगोळी (Rangoli) या कलेचा सामावेश होतो. सौंदर्याचा साक्षात्कार व मंगलाची सिद्धी हे रांगोळीचे उद्देश मानले जातात. रांगोळी म्हणजे रंगांच्या सहाय्याने रेखाटलेल्या ओळींपासून तयार झालेली आकृती. भारतीय संस्कृतीमध्ये रांगोळीला फार महत्व आहे. रांगोळीचा उल्लेख रामायण, महाभारत तसेच वेदांसोबत अनेक ग्रंथांमध्येही आढळतो. भारतासहित अनेक देशांमध्ये या कलेचा प्रसार झालेला आहे.
हिंदू धर्मात दैनदिन कार्यात रांगोळीचे अनन्या साधारण महत्व आहे. तसेच धार्मिक कार्य व सण यामध्येदेखील रांगोळीचे असाधारण असे महत्व आहे. पूर्वीपासून प्रत्येक दिवसाला किंवा सणाला वेगवेगळ्या आकाराची रांगोळी काढण्याची प्रथा चालत आलेली आहे. देवघर, अंगण, उंबरठा तसेच तुळशी जवळ रांगोळी काढली जाते. आजपासून संपूर्ण महाराष्ट्रात तुळशी विवाहाला (Tulsi Vivah 2019) सुरूवात झाली आहे. तुम्हीही या दिवशी तुळशी वृंदावनासमोर स्पेशल तुळशीची वृंदावन असलेली किंवा श्रीकृष्णाची रांगोळी काढू इच्छीत असाल तर हा लेख तुम्हाल नक्की उपयोगात येईल. चला तर मग तुळशी विवाहानिमित्त खास रांगोळ्या कशा काढायच्या ते पाहुयात...
हेही वाचा - Tulsi Vivah 2019 Shubh Muhurat: मंगलअष्टकाच्या सुरात 'या' मुहूर्तावर लावा तुळशी आणि बाळकृष्णाचा शुभविवाह
तुळशी विवाहानिमित्त विशेष रांगोळ्या -
संस्कृतमध्ये रांगोळीला 'रंगावली', असं म्हटलं जातं. धार्मिक तसेच मंगलमय कार्यक्रमात रांगोळीचे विशेष महत्त्व आहे. रांगोळी नसेल तर तो सण, कार्यक्रम अपुरा वाटतो. रांगोळीमुळे कार्यक्रमातील सुंदरता आणि धार्मिक आत्मीयतेचे दर्शन होते. रांगोळी हा भारतीय संस्काराचा एक उत्तम प्रकार आहे. रांगोळी घराची सुंदरता वाढवते आणि सणाला देवाला घरात येण्याची अनुभूती देते, असंही मानलं जातं. त्यामुळे घराच्या दारासमोर किंवा अंगणात रांगोळी काढणं शुभ मानलं जातं.