तुलसी विवाह 2019 (Photo Credits: Instagram)

Tulsi Vivah 2019 Shubh Muhurat: हिंदू संस्कृतीमध्ये तुळशीला पवित्र समजले जाते. याव्यतिरिक्त तुळशीचे सेवन करणे आपल्या आरोग्यासाठी फायदेशीर ठरते. आजपासून तुळशी विवाहाला (Tulsi Vivah 2019) सुरूवात झाली असून 12 नोव्हेंबरला तुळशी विवाहाची समाप्ती होणार आहे. आज सर्वत्र तुळशी विवाहाची धांदल उडाली असून अनेक घरात सजावटीचं काम सुरू आहे. काही कुटुंबामध्ये तुळशीचं लग्न लावताना मंगलअष्टक म्हणण्याची परंपरा आहे. तुळशी विवाह केल्याने आपल्याला अनेक फायदे मिळतात. त्यामुळे विवाहित जोडप्याने तुळशी विवाह करणं गरजेचं आहे. तुम्हीही आज तुळशी विवाह करणार असाल, तर तुळशी विवाहाचा 'शुभ मुहूर्त' आणि 'मंगलअष्टक' नक्की जाणून घ्या. (हेही वाचा - Happy Tulsi Vivah 2019 HD Images: तुलसी विवाह शुभेच्छा निमित्त मराठी Greetings, Wallpapers, WhatsApp Stickers शेअर करुन साजरा करा कार्तिकी द्वादशीचा सण!)

तुळशी विवाह केल्याने घरात सुख, शांती आणि समृद्धी नांदते. तसेच धनलाभही होतो. कार्तिकी एकादशीला चार महिने निद्रिस्त अवस्थेमध्ये असलेले भगावान विष्णू जागे झाल्यानंतर कार्तिकी द्वादशी ते कार्तिकी पौर्णिमा दरम्यान तुलसी विवाह सोहळा पार पडतो. पौराणिक कथेनुसार, लक्ष्मीच्या रूपातील तुळस आणि विष्णुच्या रूपातील शाळीग्राम यांचा विवाह या काळात पार पडतो. आणि त्यानंतर शुभा कार्याची, लग्न सोहळ्यांची सुरूवात होते.

तुळशी विवाहाचा शुभ मुहूर्त - (Tulsi Vivah 2019 Shubh Muhurat)

9 नोव्हेंबर 2019 सकाळीपासून दुपारी 02:39 वाजेपर्यंत

'या' मंगलअष्टकाच्या सुरात लावा तुळशी विवाह -

कार्तिक शुद्ध एकादशीपासून पौर्णिमेपर्यंत कोणत्याही दिवशी तुळसी विवाह केला जातो. पूर्वी कार्तिक शुद्ध द्वादशीस तुलसीविवाह झाल्यानंतर चातुर्मासात जी व्रते घेतलेली असतील, त्या सर्वांची समाप्ती करून व चातुर्मास्यात जे पदार्थ वर्ज्य केले असतील ते पदार्थ ब्राह्मणाला दान केले जातात. त्यानंतर स्वत: जेवण करण्‍याची पद्धत आहे. तुळशीच्या दर्शनाने हजारो गायी दान केल्याचे पुण्य लाभतं. मृत्यू झाल्यानंतर अंगावर तुळशीपत्र असेल, तर व्यक्ती वैकुंठास जातो, असंही म्हटलं जातं.