
Tripurari Purnima HD Images: कार्तिक पौर्णिमेला त्रिपुरारी पौर्णिमा म्हणून ही ओळखले जाते. त्रिपुरारी पौर्णिमेच्या दिवशी भगवान शंकराच्या मंदिरात त्रिपूर वात लावली जाते. एकादशीपासून सुरू झालेले तुळशी विवाह करण्याचा हा शेवटचा दिवस असतो. तर बौद्ध धर्मात असे मानले जाते की, कार्तिक पौर्णिमेच्या दिवशी तथागत बुद्धांचा एक पट्टशिष्य धम्म सेनापती सारिपुत्रज्ञचे परिनिर्वाण झाले होते. या पौर्णिमेला बौद्ध धर्मीय स्त्री-पुरुष आठ शीलांचे पालन व उपोसथ व्रत करतात. (Tulsi Vivah Shubh Muhurat 2020 Time: महाराष्ट्रात आजपासून तुळशी विवाहाला प्रारंभ; जाणून घ्या तारखा आणि शुभ मुहूर्त)
महाराष्ट्रातील सर्व मंदिरे अशा तऱ्हेने उजळून निघतात, जणू काही देवच दिवाळी साजरी करीत आहेत. देवांनींच मंदिरे प्रकाशमय केली आहेत. म्हणून या त्रिपुरी पौर्णिमेला देव दिवाळी ही असे म्हणतात. जे जे चांगले ते ते रुजवावे, वाईट तेवढे काढूनी टाकावे, हाच खरा त्रिपुरी पौर्णिमेचा संदेश आहे.(Kartiki Ekadashi Vrat Fast Recipes: यंदा कार्तिक एकादशी च्या व्रतासाठी घरी बनवा फराळी स्टिक, रताळे-बटाट्याचा शिरा यांसारखे उपवासाचे 'हे' खमंग पदार्थ, Watch Videos)





कार्तिक पौर्णिमेला देशभरातील विविध भागांमध्ये जत्रा भरतात. यात्रा काढल्या जातात. कार्तिक पौर्णिमेला मुख्यत्वे करून कार्तिकेयाचे पूजन केले जाते. कार्तिकेयांना दक्षिण दिशेचे स्वामी मानले जाते.