Kartiki Ekadashi Vrat Fast Recipes (Photo Credits: YouTube)

Kartiki Ekadashi 2020 Fast Recipes: हिंदू पंचांगानुसार, वर्षभरात येणा-या दोन एकादशींपैकी आषाढी आणि कार्तिकी एकादशी (Kartiki Ekadashi) या दोन एकादशी भाविकांसाठी फार महत्त्वाच्या असतात. आषाढी एकादशी प्रमाणे कार्तिकी एकादशीला देखील भाविक पांडुरंगाच्या दर्शनासाठी पंढरपूरास जातात. या दरम्यान चातुर्मास पाळला जातो. यंदा ही कार्तिकी एकादशी 25 नोव्हेंबरला आली आहे. या दिवशी भक्तगण विठुरायासाठी उपवास करतात. विठोबाची मनोभाव पूजाअर्चा करुन हे व्रत सोडतात. अशा वेळी उपवासास अनेक लोक साधारणत: साबुदाणा खिचडी वा बटाट्याचा खिस असे पदार्थ केले जातात. यंदा मात्र काही वेगळं आणि काहीतरी हटके पदार्थ ट्राय करा.

यंदा घरात राहूनच आपल्याला कार्तिकी एकादशीचा उत्सव साजरा करायचा असल्याने अगदी साधेपणाने हा सण साजरा करा. त्यासाठी घरात उपवासाचे थोडे हटके आणि खमंग असे पदार्थ बनवा.

फराळी स्टिक

हेदेखील वाचा- Kartiki Ekadashi 2020 Date: यंदा कार्तिकी एकादशी 25 की 26 नोव्हेंबर नेमकी कधी साजरी होणार?

उपवासाचे दहीवडे

रताळे बटाट्याचा शिरा आणि भगर भात

नगेट्स

अश्विन महिना अधिक आल्याने यंदाचा चातुर्मासाचा कालावधी तब्बल पाच महिन्यांचा झाला. नोव्हेंबर महिन्याच्या उत्तरार्धात चातुर्मास समाप्त होत आहे. त्यामुळे या दिवसाची चांगली सांगता करण्यासाठी हे चमचमीत आणि खमंग असे उपवासाचे पदार्थ घरी नक्की ट्राय करा.