कार्तिकी एकादशीला चातुर्मासाची सांगता झाल्यानंतर कार्तिक शुक्ल पौर्णिमेला (Kartik Purnima 2020) 'त्रिपुरारी' पौर्णिमा (Tripurari Purnima) साजरी केली जाते. यंदा हा त्रिपुरारी पौर्णिमेचा सोहळा रविवार, 29 नोव्हेंबर दिवशी साजरा केला जाणार आहे. या दिवशी मंदिर आणि घरा-दाराच्या परिसरात दिवे लावण्याची प्रथा आहे. हिंदू धर्मीय हा सोहळा दीपदान करून देखील साजरा करतात. अनेक मंदिरांमध्ये बाजूच्या बाजूला दीपस्तंभावर (त्रिपुर) असलेल्या ठिकाणी दिव्यांची आरास केली जाते. Vivah Shubh Muhurat 2020: यंदा तुळशी विवाहानंतर सरत्या वर्षाला निरोप पूर्वी लग्नबेडीत अडकण्यासाठी पहा नोव्हेंबर, डिसेंबर मधील विवाहाचे मुहूर्त!
हिंदू पुराण कथेनुसार, भगवान शंकर, भगवान विष्णू यांची त्रिपुरारी पौर्णिमेच्या रात्री 12 वाजता भेट होते. अशी धारणा आहे. त्यामुळे या दिवशी शंकराला प्रिय असलेला बेल आणि भगवान विष्णूची प्रिय तुळस अर्पण करण्याची पद्धत आहे.
त्रिपुरारी पौर्णिमा तिथी वेळ, तारीख
त्रिपुरारी पौर्णिमा तारीख- 29 नोव्हेंबर 2020
त्रिपुरारी पौर्णिमा तिथी प्रारंभ - 29 नोव्हेंबर दिवशी 12:49
त्रिपुरारी पौर्णिमा तिथी समाप्ती - 30 नोव्हेंबर दिवशी 06:03
त्रिपुरारी पौर्णिमेची कहाणी
त्रिपुरारी पौर्णिमेची एक पौराणिक कथा देखील सांगितली जाते. यामध्ये तारकासूर नावाचा राक्षस होता. त्याला ताराक्ष, कमलाक्ष आणि विद्युन्माली असे 3 पुत्र होते. दरम्यान मयासुराने तीन राज्यं बनवली आणि ती ताब्यात देताना सांगितले की, तुम्ही देवांना त्रास देऊ नका. मात्र या तिघांनी ते ऐकलंच नाही. देवांना त्रास दिला. अखेर भगवान शंकरांनी कार्तिक पौर्णिमेला त्रिपुरासुराला जाळून टाकलं. त्याच्या तिन्ही मुलांना ठार केले. हा दिवस देवांनी आनंदोत्सव साजरा करत दिव्यांची आरास करत साजरा केला. म्हणून त्रिपुरारी पौर्णिमेला दिव्यांची आरास करून देव दिवाळी साजरी केली जाते.
दरम्यान सात्विक मनं एकत्र करून दैवी शक्ती निर्माण करून दानवांचा नाश करा. सदाचार, सदविचार अंगिकारा असा संदेश देण्यासाठी त्रिपुरारी पौर्णिमा साजरी केली जाते.