
भारतामध्ये तुळशीची लग्नं लागली की हिंदू धर्मीय लग्नाळू तरूण, तरूणींच्या लगीनघाईला सुरूवात होते. मागील चातुर्मासाच्या (Chaturmas) चार महिन्यात थंडावलेली लगीनसराई पुन्हा सुरू होते. अशामध्ये यंदा 26 नोव्हेंबरला कार्तिकी एकादशी (Kartiki Ekadashi) म्हणजेच प्रबोधिनी (Prabodhini) किंवा देव उठनी एकादशी (Dev पार पडल्यानंतर निद्रिस्त अवस्थेतील भगवान विष्णू पुन्हा जागे होतात आणि मंगकार्याला सुरूवात होते. त्यामुळे यंदा 2020 हे वर्ष संपण्याआधीच तुम्हांला देखील लग्न विधी पार पाडायचे असतील तर जाणून घ्या 2020 हे ग्रेगेरियन वर्ष संपण्याआधी नोव्हेंबर आणि डिसेंबर 2020 मध्ये लग्नाच्या शुभ मुहूर्तामध्ये कोणत्या तारखांचा समावेश होतो.
हिंदू धर्मामध्ये लग्न हा एक महत्त्वाचा संस्कार मानला जातो. प्रत्येकाच्या कुळाचाराप्रमाणे लग्नाचे विधी वेगवेगळे असतात. परंतू अनेक जण लग्नासारखा महत्त्वाचा विधी, आयुष्याला वळण देणारा टप्पा निवडताना चांगला मुहूर्त पाहून लग्नाची तारीख ठरवतात. मग यंदा 2020 या वर्षाला निरोप देण्याआधीच तुम्हांला लग्नाच्या बेडीत अडकायचं असेल तर नोव्हेंबर आणि डिसेंबर महिन्यात काही महत्त्वाचे लग्नाचे मुहूर्त आहे. Tulsi Vivah 2020 Date and Shubh Muhurat: यंदा तुळशी विवाह कधी आणि कसा कराल? जाणून घ्या शुभ मुहूर्त आणि महत्त्व.
नोव्हेंबर, डिसेंबर 2020 मधील लग्नाचे मुहूर्त कोणते?
यंदा 26 नोव्हेंबर ते 30 नोव्हेंबर या काळात तुळशीची लग्नं पार पडणार आहेत. त्यामुळे 26 नंतर लग्नांच्या तारखांना सुरूवात होत आहे.
नोव्हेंबर 2020: 26, 29 व 30
डिसेंबर 2020: 1, 2, 6, 7,8, 9, 10 व 11
भारतामध्ये अजूनही कोरोनाचं संकट पूर्णपणे शमलेले नाही. त्यामुळे नोव्हेंबर, डिसेंबर महिन्यात लग्नाचा बार उडवणार असाल तर तुम्हांला काही कोविड 19 विषयक नियमावलींचा विचार करूनच लग्नाचे विधी आणि सोहळा करावा लागणार आहे. उपस्थितांच्या आकड्यावरही कोरोना काळात सध्या निर्बंध आहेत. त्यामुळे सुरक्षेची काळजी घेतच तुम्हांला लग्नाचा सोहळा साजरा करावा लागणार आहे.