Bhaubeej 2024 (फोटो सौजन्य - फेसबुक)

Bhaubeej 2024 Muhurat: आज सर्वत्र भाऊबीजेचा (Bhaubeej 2024) सण साजरा होत आहे. दरवर्षी कार्तिक महिन्यातील शुक्ल पक्षाच्या दुसऱ्या दिवशी भाऊबीजेचा सण साजरा केला जातो. या दिवशी बहीण आपल्या भावाच्या कपाळावर तिलक लावून त्याच्या सुख आणि दीर्घायुष्यासाठी प्रार्थना करते. त्याच बरोबर भाऊ सुद्धा बहिणीला काहीतरी भेटवस्तू देतो. भाऊबीजला यम द्वितीया, भाऊ बीज, भाई दूज, भात्र द्वितीया आणि भत्रु द्वितीया असेही म्हणतात. चला तर मग आऊबीजेच्या दिवशी भावाचे औक्षण करण्यासाठीचा शुभ मुहूर्त आणि महत्त्व जाणून घेऊया.

लक्ष्मीपूजनाच्या दोन दिवसांनी यम द्वितीया येते. यमद्वितीयाच्या पवित्र सणावर मृत्यूची देवता यमराजाची पूजा केली जाते. यमद्वितीयेच्या दिवशी भगवान चित्रगुप्त आणि यमदूतांसह यमदेवांचीही पूजा केली जाते. धार्मिक मान्यतेनुसार, कार्तिक शुक्ल पक्षाच्या द्वितीयेला यमुनेने तिचा भाऊ यम यालाही आपल्या घरी जेवायला बोलावले होते, म्हणून या दिवसाला यम द्वितीया असेही म्हणतात. धर्मग्रंथानुसार या शुभ मुहूर्तावर ज्या बहिणी आपल्या भावांना अन्नदान करतात त्यांना अखंड सौभाग्य प्राप्त होते. या दिवशी बहिणीच्या घरी भोजन केल्याने भावांना दीर्घायुष्य मिळते. म्हणूनच भाऊबीजेच्या दिवशी बहिणी आपल्या भावांसाठी खास स्वयंपाक बनवते आणि त्यांना स्वतःच्या हाताने खाऊ घालतात. (हेही वाचा - Happy Bhaubeej 2024 HD Images: भाऊबीज निमित्त Wallpapers, Wishes शेअर करुन लाडक्या भाऊ-बहिणीला द्या खास मराठी शुभेच्छा!)

भाऊबीज शुभ मुहूर्त -

  • कार्तिक महिन्याच्या शुक्ल पक्षाची द्वितीया 2 नोव्हेंबर 2024 रोजी रात्री 8:21 पासून सुरू होते.
  • कार्तिक महिन्याच्या शुक्ल पक्षाची द्वितीया 3 नोव्हेंबर 2024 रोजी रात्री 10:05 वाजता समाप्त होते.
  • भाऊबीजेची दुपारची वेळ - 3 नोव्हेंबर रोजी दुपारी 1:10 ते 3:22 पर्यंत

भाऊबीजेच्या दिवशी हे नियम पाळा -

औक्षणाच्या वेळी भावाचे तोंड उत्तर किंवा वायव्य दिशेला असावे. बहिणीचे तोंड ईशान्य किंवा पूर्वेकडे असावे. या दिवशी भावाने बहिणीच्या घरी जेवण करावे. भाऊबीजेच्या दिवशी भावाने बहिणीला काहीतरी भेटवस्तू द्यावी. भावाचे राहू काळात औक्षण करू नये. भाऊबीजेच्या दिवशी सूर्यास्तानंतर कधीही भावाला टिळक लावू नका, असे करणे शुभ मानले जात नाही.

(Disclaimer: येथे दिलेली माहिती धार्मिक श्रद्धा आणि लोकश्रद्धेवर आधारित आहे. त्यासाठी कोणताही वैज्ञानिक पुरावा नाही. लेटेस्टली मराठी यातील एकाही गोष्टीच्या सत्यतेचा पुरावा देत नाही.)