
Happy Bhaubeej 2024 HD Images: दिवाळीच्या 2 दिवसांनंतर भाऊबीजेचा (Bhaubeej 2024) सण साजरा केला जातो. या दिवशी बहिणी आपल्या भावाचे औक्षण करते. तसेच त्याच्यासाठी प्रार्थना करते. या बदल्यात भाऊ आपल्या लाडक्या बहिणीला खास भेटवस्तू देतो. हा सण भाऊ-बहिणीच्या प्रेमाचे प्रतीक आहे. यंदा 3 नोव्हेंबरला भाऊबीजेचा सण साजरा करण्यात येणार आहे.
भाऊबीजेलाचं भात्री द्वितीया, भाई द्वितीया किंवा भात्री द्वितीया असं म्हटलं जातं. या दिवसाला यम द्वितीया असेही म्हणतात. कार्तिक महिन्याच्या दुसऱ्या दिवशी हा दिवस साजरा करण्याची प्रथा आहे. यम द्वितीयेला, यमराजाची पूजा केली जाते. भाऊबीजेचा सण भाऊ-बहिणींसाठी खूपचं खास असतो. तुम्ही या दिवशी आपल्या लाडक्या भावाला किंवा बहिणींला खालील Wallpapers, Wishes शेअर करुन खास मराठी शुभेच्छापत्र पाठवू शकता.
माझ्या लाडक्या भावाला
भाऊबीजेच्या खूप खूप शुभेच्छा!

माझ्या दादाला उदंड आयुष्य लाभो
हिच आई जगदंबेकडे प्रार्थना
भाऊबीजेच्या खूप खूप शुभेच्छा

जपावे नाते निरामय भावनेने
जसे जपले मुक्ताईला ज्ञानेश्वराने
भाऊबीजेच्या शुभेच्छा

लक्ष दिव्यांना उजळू दे
बहीण-भावाचे पवित्र नाते
भाऊबीजेच्या हार्दिक शुभेच्छा!

सण भावाबहीणीच्या पवित्र नात्याचा
भाऊबीजेच्या हार्दिक शुभेच्छा!

धार्मिक ग्रंथांनुसार, कार्तिक शुक्ल द्वितीयेच्या दिवशी यमुनेला तिचा भाऊ यमाकडून आदराचे चिन्ह म्हणून वरदान मिळाले होते, त्यामुळे भाऊबीजेला यम द्वितीया म्हणूनही ओळखले जाते. यमराजाच्या इच्छेनुसार या दिवशी यमुनेत स्नान करून यमाची पूजा करणाऱ्या व्यक्तीला मृत्यूनंतर यमलोकात जाण्याची गरज नसते. सूर्याची कन्या यमुना ही सर्व संकटे दूर करणारी देवी स्वरूपा मानली जाते. त्यामुळे यम द्वितीयेच्या दिवशी यमुना नदीत स्नान करून यमुना आणि यमराजाची पूजा करण्याचे विशेष महत्त्व आहे. या दिवशी बहीण भावाला टिळक लावते आणि त्याच्या दीर्घायुष्यासाठी यमराजाकडे प्रार्थना करते.