Lunar Eclipse 2019: उद्या दिसणार 'सुपर ब्लड मून' ग्रहण, जाणून घ्या वेळ
Lunar Eclipse (Photo Credits- Twitter)

Lunar Eclipse 2019:  नवं वर्षात (2019) पहिल्या आठवड्यात सूर्यग्रहण (Solar Eclipse) झाले आहे. तसेच जानेवारी महिना संपत आला असला तरीही पूर्ण चंद्रग्रहण (Lunar Eclipse) दिसणार आहे. सोमवारी (21 जानेवारी) पौर्णिमा असून वर्षातील पहिले चंद्रग्रहण दिसून येणार आहे. वैज्ञानिक दृष्ट्या उद्याचे चंद्रग्रहण खूप महत्वाचे मानले जात असून त्याला 'सुपर ब्लड मून' (Super Blood Moon) असे नाव देण्यात आले आहे.

उद्या दिसणाऱ्या चंद्रग्रहणात चंद्र हा 14 टक्के मोठा दिसणार असून 30 टक्के चमकदार दिसणार आहे. त्यामुळेच चंद्रग्रहाणात चंद्र लाल रंगाचा दिसणार आहे. तर रात्रीच्या अंधारात हा अद्भुत नजराणा लोकांना आणि खगोलशास्रज्ञांना पाहायला मिळणार आहे. त्यामुळेच या चंद्रग्रहणाला 'ब्लड मून' असे म्हटले जाते.

कधी पर्यंत होणार चंद्रग्रहण?

भारतीय वेळेनुसार उद्याचे चंद्रग्रहण रात्री 10.11 वाजता सुरु होऊन जवळजवळ एक तास म्हणजेच 11.12 वाजेपर्यंत राहणार आहे. जेव्हा पृथ्वी आणि सूर्य एका रांगेत येतात आणि जेव्हा चंद्रावर पृथ्वीची सावली पडते त्यावेळी चंद्रग्रहण होते असे मानले जाते. ग्रहण सुरु होण्यापूर्वी सुतक 12 तास अगोदर सुरु होते. त्यामुळे सुतक 20 जानेवारी रात्री 9 वाजल्यापासून सुरु होणार आहे.

कुठे दिसणार चंद्रग्रहण?

चंद्रग्रहण हे उद्या भारतात दिसणार नाही. तर आफ्रिका, युरोप, उत्तर-दक्षिण अमेरिका आणि मध्य प्रशांत सागर येथे दिसून येणार आहे. तसेच न्यूयॉर्क, लंडन, लॉस ऐंजलिस, पॅरिस, मास्को, शिकागो आणि वॉश्गिंटन येथे ही दिसून येणार आहे.