काही तासांत नवीन वर्ष 2022 ची सुरूवात होणार आहे. रात्रीचे 12 वाजण्याची वाट आपण आतुरतेने पहात आहोत. अनेक जण नवीन वर्षाचे प्लान (New Year Plans) करत असतील, आणि बहुतांश जण दिवसभरात ठरवणार की नवीन वर्षाचे स्वागत कसे करायचे ? काय नवीन प्लान करायचा, काय वेगळ करायच,हा विचार अनेक जण करत असतील.भारतात अजुन आपण प्लान करत आहोत, नवीन वर्ष कसे साजरे करायचे त्याचा विचार करत आहोतपण काही देशात नवीन वर्ष लागले सुद्धा आहे आणि त्या देशाने नवीन वर्षात पदार्पण केले आहे. देशातील वेगवेगळ्या वेळेमुळे प्रत्येक देश वेगळ्या वेळेत नवीन वर्षात पदार्पण करणार आहे. चला तर जाणून घेऊया कोणता देश कोणत्या वेळेत नवीन वर्षात पदार्पण करणार आहे. हे देखील वाचा: New Year 2022 Good Luck: घरात आनंदाचे वातावरण पाहिजे असल्यास, या गोष्टी करुन पाहा .
भारतीय वेळेनुसार कोणता देश किती वाजता नवीन वर्षात पदार्पण करणार ते बघणार आहोत. कोणता देश प्रथम नवीन वर्ष साजरा करतो, कोणता देश सर्वात शेवटी नवीन वर्षाचे स्वागत करतो ते पाहूया..
ओशनियाच्या पूर्वेकडील बेटे प्रथम स्वागत करतील टोंगा, सामोआ ही लहान पॅसिफिक बेट आणि किरिबाती हे नवीन वर्षाचे स्वागत करणारे पहिले देश आहेत जिथे 1 जानेवारी रोजी GMT सकाळी 10 वाजता किंवा डिसेंबर रोजी दुपारी 3:30 वाजता सुरू होते. नवीन वर्ष साजरे करण्यात न्यूझीलंड (New Zealand) पुढे आहे.त्यानंतर ऑस्ट्रेलिया (Australia), जपान (Japan) आणि दक्षिण कोरियाचा (South Korea) क्रमांक लागतो.
नवीन वर्षाचे पहिले आणि शेवटचे स्वागत कोण करणार बघूया...
31 डिसेंबर रोजी दुपारी 3:30 वाजता, टोंगा सामोआ, आणि ख्रिसमस आयलंड/किरिबाटी नवीन वर्षात प्रवेश करतील त्यानंतर दुपारी 3:45 वाजता चथम हे बेट पदार्पण करेल.
दुपारी 4.30 वाजता- न्यूझीलंड
संध्याकाळी 5:30 वाजता- रशिया
संध्याकाळी 6.30 वाजता -ऑस्ट्रेलियाचे मेलबर्न, सिडनी, कॅनबेरा, होनियारा
संध्याकाळी 7 वाजता - अॅडलेड, ब्रोकन हिल, सेडुना
संध्याकाळी 7:30 वाजता-ब्रिस्बेन, पोर्ट मोरेस्बी, हॉगताना
रात्री ८ वाजता-डार्विन, अॅलिस स्प्रिंग्स, टेनंट क्रीक..
रात्री 8:30 वाजता - टोकियो, सोल, प्योंगयांग,जपान आणि दक्षिण कोरिया
रात्री 9.30 वाजता - चीन आणि फिलीपिन्स
रात्री 10:30 वाजता - इंडोनेशिया आणि थायलंड
रात्री ११ वाजता - म्यानमार
रात्री 11.30 वाजता- बांगलादेश
रात्री 11:45 वाजता - नेपाळचे काठमांडू, पोखरा, विराटनगर, धरण..
12:00 वाजता - भारत आणि श्रीलंका
12:30 वाजता- 1 जानेवारी पाकिस्तान
सकाळी 1 वाजता- अफगाणिस्तान
यानंतर अझरबैजान, इराण, मॉस्को, ग्रीस
1 जानेवारी, IST पहाटे 5:30 वाजता, युनायटेड किंगडम नवीन वर्षाचे स्वागत करेल..
यानंतर ब्राझील आणि न्यूफाउंडलँड
भारतीय वेळेनुसार सकाळी 9:30 ते दुपारी 1:30 पर्यंत, कॅनडा,आणि त्यानंतर यूएसए नवीन वर्षाचे स्वागत करेल.यानंतर मार्केसास बेटे, अमेरिकन सामोआ आणि शेवटी, भारतीय वेळेनुसार संध्याकाळी 5:50 वाजता, आउटलाइंग बेट
मग आता तुमच्या प्रियजणांना ते ज्या देशात आहेत तेथे या वेळा पाहून नववर्षाच्या शुभेच्छा देत हॅप्पी न्यू इयर विश करू शकता. त्यांच्या नववर्षाची सुरूवात आनंदामध्ये करण्यासाठी सोशल मीडीयातही तुम्ही काही मेसेजेस पाठवू शकता.