नवीन वर्ष चांगले जावे असे प्रत्येकालाच वाटत असते. नवीन वर्षात केलेल्या कष्टाचे फळ मिळवे, अंगणी सुख-समृद्धी नांदावी असे अनेकांना वाटते आणि जो तो आपल्या परीने अनेक उपाय करत असतात. सुख-समृद्धी आणि जीवनात भरभराटी यावी म्हणून अनेक उपाय लोक करतात, काहींना त्या अंधश्रद्धा वाटतात. तर काही लोक श्रद्धेने सगळ्या गोष्टी करतात. 2021 चे वर्ष आता सरत आले आहे. प्रत्येक जण उत्साहाने नवीन वर्षाच्या स्वागतासाठी सज्ज झाले आहेत. मागील वर्षी केलेल्या चुका परत न करण्याचा निर्धार सगळ्यांनीच केला आहे. कारण सगळ्यांनाच नवीन वर्षात येणाऱ्या संधीचे सोने करायचे आहे. त्यासाठी काही उपाय आहे. याशुभ गोष्टी सोबत ठेवल्यास सकारात्मक उर्जा आकर्षित होते. आपल्यापैकी अनेकांना त्याचा अनुभव देखील आला असेल. चला तर पाहूया कोणत्या आहेत त्या गोष्टी
श्री गणेश मूर्ती
गणेश बुद्धीचे आणि कलेचे दैवत मानले जातात, नवीन वर्षात गणेशाची मूर्ती घरी आणल्यास घरात सुख-समृद्धी येईल.आपल्यापैकी अनेकांना याचा अनुभवही आला असेल.
गणपतीची श्रद्धेने भक्ती करणाऱ्याला याचा अनुभव नक्की येतो. नवीन वर्षात जर गणपतीची मूर्ती घरात आणली तर त्याचे सकारात्मक लाभ नक्कीच बघायला मिळतील.
स्वस्तिक
हिंदू धर्मात स्वस्तिकला शुभ चिन्ह मानले जाते. नवीन वर्षात आपण दारावर स्वस्तिक काढले किंवा लावले तर आपल्या घरात शांती राहते.आणि नवीन वर्षात जर आपण घरात श्री फळ आणले तर वर्ष भर सकारात्मक उर्जा आपल्या घरात येईल.
नारळ
नारळ ला श्री फळ असे हि म्हटले जाते. सनातन धर्मात कोणतेही शुभ कार्य नारळ शिवाय पूर्ण होत नाही. नारळ घरात आणल्यास सुख -समृद्धी वास करते.
शंख
हिंदू धर्मात शंख नाद करण्याचे विशेष महत्व आहे आणि शंखाचे पण शंख नाद केल्याने किंवा शंख घरी असल्याने घरात सकारात्मक उर्जा नेहमी वास करेल.
मोराचे पंख
मोराचे पंख घरी आणल्यास दु:ख दूर होते, नवीन वर्षात मोराचे पंख घरी आणल्यास घरात आनंदाचे वातावरण राहील.