Shravan Jara Jivantika Vrat 2022: श्रावण शुक्रवारी केल्या जाणाऱ्या जिवती पूजेची तारीख, पूजा विधी, कथा आणि आरती, जाणून घ्या
Jara Jivantika (Photo Credits: File)

 Jara Jivantika Vrat Puja 2022:  श्रावण महिना हा उत्सव समारंभांनी भरलेला पवित्र महिना आहे. श्रावण म्हणजे आनंद, श्रावण म्हणजे उत्साह, श्रावण म्हणजे पवित्रता होय. हिंदू धर्मात श्रावण महिन्याला पवित्र मानले जाते. कारण, श्रावण महिना भगवान शंकरला समर्पित असतो त्यामुळे श्रावण सोमवारला खूप महत्व असते. श्रावण सोमवारला व्रत केले जातात. श्रावणचा पूर्ण महिना पवित् असल्यामुळे तुम्ही ज्या देवाला मानतात त्या वारला व्रत ठेवले जातात. दरम्यान, श्रावण शुक्रवारचेही खूप महत्व असते. श्रावण महिन्यात प्रत्येक दिवसाला वेगळे महत्त्व आहे. श्रावणी सोमवार, मंगळवारी मंगळागौर, बुधवारी -बृहस्पती पूजन झाल्यावर श्रावणी शुक्रवार येतो. श्रावणी शुक्रवारचे महत्व अनेकांना माहित नसते, श्रावण शुक्रवारी मुलांना औक्षण केले जाते आणि जरा जिवतीची पूजा केली जाते. २९ जुलै, ५ ऑगस्ट, १२ ऑगस्ट व १९ ऑगस्ट रोजी श्रावण शुक्रवार आहे. जिवतीची पूजा, शुक्रवारची कथा, महत्त्व आणि मान्यता यांविषयी संपूर्ण माहिती जाणून घेऊया, वाचा पूर्ण माहिती [हे देखील वाचा: Shravan Month 2022 in Maharashtra: महाराष्ट्रात श्रावणमासारंभ 29 जुलै पासून; श्रावणी सोमवार व्रत, मंगळागौर सह या पवित्र महिन्यातील सण, व्रतांच्या जाणून घ्या तारखा]

जिवतीची पूजा:

श्रावणातल्या प्रत्येक शुक्रवारी जिवतीची पूजा केली जाते. जिवतीची पूजा मुलांच्या रक्षणार्थ केली जाते. जिवतीच्या पूजेसह कुलदेवी आणि लक्ष्मी मातेची पूजा केली जाते. जिवतीची पूजा करतांना जरे जीवन्तिके देवि बालयुक्ते प्रमोदिनी। रक्षाव्रते महाशक्ति पूर्णकामे नमोस्तुते।।, हा म्हटला जातो. पूजेसाठी दूर्वा, फुले, आघाड्याची पाने असणे आवश्यक आहे. २१ मण्यांचे कापसाचे गेजवस्त्र घालावे. अक्षता, धूप, दीप , फुल नैवेद्य, इत्यादी अर्पण करावे. जिवतीची पूजा झाल्यानंतर घरातील मुलांना पाटावर बसवून त्यांचे औक्षण करावे. मुले परगावी असल्यास चारही दिशांना औक्षण करून अक्षता टाकाव्या म्हणजे परगावी असलेल्या मुलांचे औक्षण केल्यासारखे होईल. महत्वाचे म्हणजे पूजा झाल्यावर देवीची ओटी भरावी.जिवंतिका पूजनामुळे घरात, आरोग्य, धन, सुख लाभते असे म्हटले जाते.

जरा जिवंतिका कथा :

जरा जिवंतिका देवी ही बालकांची रक्षण करणारी देवी आहे. पुराणात असे सांगितले आहे की, जरा ही राक्षसीण होती. जरा राक्षसीणचे मगध देशांत वास्तव्य होते. मगध मधील नरेश वृद्धाला शरीराचे दोन वेगवेगळे भाग असलेला मुलगा झाला होता. शरीराचे वेगवेगळे भाग असल्यामुळे वृद्ध नरेशने त्या मुलाला नगराबाहेर फेकून फेकून दिले होते. दरम्यान, जरा राक्षसीण त्या मुलाला बघते आणि बाळाच्या शरीराचे जे दोन भाग झाले होते ते जोडते आणि त्या नवजात बालकाला जीवदान देते. पुढे तो बालक 'जरासंध' म्हणून ओळखले जाऊ लागला. तेथील लोक तिला सर्व मुलांची आई समजू लागली. आपल्या मुलांच्या रक्षणासाठी तिची पूजा करु लागले. मगध देशात जरा राक्षसीनेचा मोठा उत्सव साजरा केला जाऊ लागला.

 

जिवतीची आरती

जयदेवी जयदेवी जय जिवती जननी ।

सुखी ठेवी संतति विनति तवचरणी ।

श्रावण येतांचि आणूं प्रतिमा । गृहांत स्थापूनि करू पूजना ।

आघाडा दुर्वा माळा वाहूंया । अक्षता घेऊन कहाणी सांगू या ।

जयदेवी जयदेवी जय जिवती जननी । सुखी ठेवी संतति विनति तवचरणी ।। १ ।।

 

पुरणपोळीचा नैवेद्य दावूं । सुवासिनींना भोजन देऊं ।

चणे हळदीकुंकू दूधहि देऊं । जमूनि आनंदे आरती गाऊं ।

जयदेवी जयदेवी जय जिवती जननी । सुखी ठेवी संतति विनति तवचरणी ।। २ ।।

 

सटवीची बाधा होई बाळांना । सोडवी तींतून तूचि तयांना ।

माता यां तुजला करिती प्रार्थना । पूर्ण ही करी मनोकामना ।

जयदेवी जयदेवी जय जिवती जननी । सुखी ठेवी संतति विनति तवचरणी ।। ३ ।।

 

तुझिया कृपेने सौख्य नांदू दे । वंशाचा वेल नीट वाढूं दे ।

सेवा हे व्रत नित्य घडूं दे । मनींचे हेतू पूर्ण होऊंदे ।

जयदेवी जयदेवी जय जिवती जननी । सुखी ठेवी संतति विनति तवचरणी ।। ४ ।।