महाराष्ट्रामध्ये आषाढ अमावस्येनंतर म्हणजे आजपासून ठीक 15 दिवसांनंतर श्रावण महिन्याची (Shravan Month) सुरूवात होणार आहे. राज्यात 29 जुलै 2022 पासून श्रावण महिन्याला (Shravan Maas) सुरूवात होत आहे. हिंदू धर्मीयांसाठी श्रावण महिना हा पवित्र महिन्यांपैकी एक आहे. या महिन्यात सण, व्रत समारंभांची रेलचेल असल्याने सारंच उत्साहाचे, जल्लोषाचे, आनंदाचे वातावरण असते. नागपंचमी (Nagpanchami) या पहिल्या सणाने श्रावण महिन्यात सणांची सुरूवात होते. तर बैलपोळा (Bailpola) हा शेवटचा सण साजरा केला जातो. श्रावण हा एक पवित्र महिना असल्याने अनेकजण या महिन्यात मांसाहार टाळतात. आषाढी अमावस्या ही गटारी अमावस्या म्हणून साजरी करत मांसाहारावर ताव मारला जातो आणि पुढे महिनाभर मांसाहार, मद्यसेवन टाळले जाते. वातावरणामधील चैतन्य कळत नकळत आपल्याही आयुष्यात घेऊन येणार्या या श्रावण महिन्यात पहा कोणते सण, व्रत-समारंभ कधी आहेत?
आषाढ अमावस्या तिथी वेळ
आषाढ अमावस्येनंतर श्रावण महिन्याची सुरूवात होते. यंदा आषाढ अमावस्या 28 जुलैच्या रात्री 11 वाजून 24 मिनिटांनी संपणार आहे त्यामुळे दुसरा दिवशी 29 जुलैपासून श्रावणमासारंभ होईल. Gatari Amavasya 2022 Messages: गटारी अमावस्येच्या WhatsApp Wishes, Facebook Greetings, Quotes, GIF Images च्या माध्यमातून द्या खास शुभेच्छा.
श्रावणी सोमवार 2022
श्रावणी सोमवारी शंकराची पूजा करून त्याला बेल आणि शिवमूठ अर्पण करण्याची प्रथा आहे.
पहिला श्रावणी सोमवार - 1 ऑगस्ट
दुसरा श्रावणी सोमवार - 8 ऑगस्ट
तिसरा श्रावणी सोमवार - 15 ऑगस्ट
चौथा श्रावणी सोमवार - 22 ऑगस्ट
मंगळागौरी पूजन 2022
नववधूंसाठी मंगळागौरीचा सण मोठा आनंदाचा असतो. यंदा 2,9,16,23 ऑगस्ट दिवशी मंगळागौरी पूजन करून खेळ खेळले जाणार आहेत.
जरा-जिवंतिका पूजन 2022
दर शुक्रवारी जरा-जिवंतिका पूजन करण्याची प्रथा आहे. यंदा श्रावण महिन्याची सुरूवातच जरा-जिवंतिका पूजनाने होणार आहे. हे पूजन यंदा 29 जुलै, 5,12,19,26 ऑगस्ट दिवशी होणार आहे.
दरम्यान श्रावण महिन्याची सुरूवात झाली की पहिला सण नागपंचमीचा असतो तो यंदा 2 ऑगस्टला आहे. त्यानंतर 11 ऑगस्टला रक्षा बंधन आणि नारळी पौर्णिमा साजरी केली जाईल. 18 ऑगस्टला श्रीकृष्ण जयंती आणि 19ऑगस्टला गोपाळकाला आहे. तर श्रावण महिन्याची सांगता 26 ऑगस्टला बैलपोळ्याने होणार आहे.