Gatari Amavasya 2022 Messages in Marathi :पवित्र महिना श्रावण महिना सुरू आहे. उत्तर भारतीय राज्यांमध्ये राहणाऱ्यांसाठी श्रावण महिना 25 जुलैपासून सुरू झाला आहे आणि 22 ऑगस्ट रोजी संपेल, तर महाराष्ट्र, गुजरात, गोवा, कर्नाटक, आंध्र प्रदेश राज्यांमध्ये मध्य प्रदेश, तामिळनाडूप्रमाणे यंदाही श्रावण महिना ९ ऑगस्टपासून सुरू होत आहे. श्रावण महिना सुरू होण्याच्या एक दिवस आधी महाराष्ट्रात गटारी अमावस्या हा सण साजरा केला जातो. गटारीला  लोक मांसाहार आणि दारूचे सेवन करतात. त्यानंतर महिनाभर लोक मांसाहार आणि दारूपासून दूर राहतात. श्रावण महिना सुरु होण्याच्या एक दिवस आधी गटारी अमावस्या साजरी केली जाते. गटारीला एकमेकांना शुभेच्छाही दिल्या जातात. गटारी अमावस्येला तुम्हीसुद्धा  अप्रतिम मराठी मेसेज, व्हॉट्सअॅप शुभेच्छा, फेसबुक ग्रीटिंग्ज, कोट्स, GIF इमेजेस तुमच्या मित्र-मैत्रिणींसोबत शेअर करून शुभेच्छा देऊ शकतात. [हे देखील वाचा:- Gatari Amavasya 2022 Date in Maharashtra: गटारी अमावस्येची तारीख आणि का साजरी केली जाते, जाणून घ्या]

द्या गटारीच्या शुभेच्छा

सुखाची किरणे येऊ द्या तुमच्या घरी,

 चिकन मटण बनवा मस्त मच्छि करी,

आम्हाला जेवायला बोलवा कधीतरी तुमच्या घरी,

पूर्ण होतील तुमच्या सर्व इच्छा,

गटारीच्या तुम्हाला खूप खूप शुभेच्छा!

कोंबडीचा रस्सा मटणाची साथ,

मच्छीची आमटी नि बिर्याणीचा भात,

बोम्बिलाची कढी भरलेला ताट,

खाऊन घ्या सगळं,

श्रावण महिना यायच्या आत...

गटारीच्या हार्दिक शुभेच्छा!

संपली केव्हाच आषाढीची वारी

चला आता जोरात करु तयारी !

थोडेसेच दिवस हातात आहेत

जोरात साजरी करूया गटारी !

गटारी अमावस्येच्या शुभेच्छा

पाऊले चालती बिअर बारची वाट,

जाताना सुसाट, येताना तराट

अजून आला नाही का घरात,

अरे पडलास की काय गटारात!

गटारी अमावास्येच्या खूप खूप हार्दिक शुभेच्छा !

ओकू नका, माकू नका

मटणावर जास्त ताव मारु नका

फुकट मिळाली तर ढोसू नका

दिसेल त्या गटारात लोळू नका

गटारीच्या गटारमय शुभेच्छा!

 

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)