Gudi Padwa 2022 Messages: गुढीपाडवा हा प्रामुख्याने महाराष्ट्रात साजरा केला जाणारा सण आहे. गुढीपाडवा हा मराठी आणि कोकणी लोकांसाठी वसंत ऋतूचा सण आहे. चैत्र प्रतिपदा तिथी, शुक्ल पक्ष या हिंदू दिनदर्शिकेनुसार महाराष्ट्र आणि गोव्यात हा उत्सव साजरा केला जातो. चैत्र महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या प्रतिपदेला नवीन हिंदू वर्ष सुरू होते. गुढीपाडवा हा सण महाराष्ट्रात नवीन वर्ष म्हणून साजरा केला जातो.
गुढी पाडवा हा गुढी आणि पाडवा या दोन शब्दांपासून बनलेला आहे. 'गुढी' चा अर्थ विजयाचा ध्वज आहे. गुढी हा विजय ध्वज आहे जो वाईटावर चांगल्याच्या विजयाचे प्रतीक आहे. तर पाडवा म्हणजे प्रतिपदा तिथी. गुढीपाडव्याच्या सणाला पहाटे उठून मोठ्या काठीने किंवा बांबूने विजयाची पताका लावतात. यासाठी पूर्वी वापरात न आलेले कापड किंवा नवीन साडी खांबावर गुंडाळली जाते. चांदीचा, तांब्याचा किंवा पितळाचा कलश, वाटी, काच किंवा लोटा उलटा ठेवला जातो आणि भगव्या रंगाच्या किंवा रेशमी कापडाने किंवा नवीन साडीने गुढी सजवले जाते.
गुढीपाडव्या निमित्त Wishes, Greetings, WhatsApp Quotes, Images शेअर करून तुम्ही मराठी नववर्षाच्या शुभेच्छा देऊ शकता. खालील ईमेज डाऊनलोड करून तुम्ही आपल्या मित्र-परिवारास गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा देऊ शकता.
वसंताची पहाट घेऊन आली,
नवचैतन्याचा गोडवा,
समृद्धीची गुढी उभारू,
आला चैत्र पाडवा..
गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा!
जगावरील कोरोनाचे संकट टळून,
सर्वांना निरोगी आयुष्य लाभो,
हीच या शुभदिनी सदिच्छा!
गुढीपाडव्याच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा !
सोनेरी पहाट,
उंच गुढीचा थाट..
आनंदाची उधळण,
अन सुखांची बरसात..
दिवस सोनेरी,
नव्या वर्षाची सुरुवात..
गुढीपाडव्याच्या भरभरून शुभेच्छा!
गुढी उभारू आनंदाची,
समृद्धीची, आरोग्याची,
समाधानाची आणि उत्तुंग यशाची,
नव वर्षाच्या शुभेच्छा..
गुढीपाडव्याच्या खूप खूप शुभेच्छा!
नक्षीदार काठीवरी रेशमी वस्त्र,
त्याच्यावर चांदीचा लोटा,
उभारुनी मराठी मनाची गुढी,
साजरा करूया हा गुढीपाडवा..
गुढीपाडव्याच्या तुम्हाला व
तुमच्या परिवारास हार्दिक शुभेच्छा!
उभारून आनंदाची गुढी दारी,
जीवनात येवो रंगत न्यारी,
पूर्ण होवोत आपल्या सर्व इच्छा-आकांशा,
नूतन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा..
गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा!
चैत्र महिना सुरू होताच हिंदू नववर्ष म्हणजेच विक्रम संवत सुरू होते. हिंदू नववर्ष हे अगदी प्राचीन काळापासून चालत आले असले तरी 2057 च्या सुमारास जागतिक सम्राट विक्रमादित्यने याची नव्याने स्थापना केली. यालाच विक्रम संवत असे म्हणतात. या विक्रम संवताला पूर्वी भारतीय दिनदर्शिका देखील म्हटले जात असे. परंतु नंतर ते हिंदू कॅलेंडर म्हणून प्रसिद्ध झाले.