Makar Sankranti 2024 Messages (फोटो सौजन्य - File Image)

Makar Sankranti 2024 Messages:  मकर संक्रांत (Makar Sankranti 2024) हा हिंदू धर्माचा प्रमुख सण आहे. हा सण संपूर्ण भारतात कोणत्या ना कोणत्या स्वरूपात साजरा केला जातो. भगवान सूर्य जेव्हा मकर राशीत प्रवेश करतो तेव्हा मकर संक्रांती साजरी केली जाते. हा सण इंग्रजी दिनदर्शिकेनुसार 14 जानेवारीला साजरा केला जातो पण कधी कधी हा सण 15 जानेवारीलाही येतो.

सूर्य धनु राशीतून कधी मकर राशीत प्रवेश करतो यावर ते अवलंबून असते. या दिवशी सूर्याची उत्तरायण संचलन सुरू होते आणि म्हणूनच याला उत्तरायण असेही म्हणतात. याशिवाय नात्यामध्ये गोडवा निर्माण करणारा सण अशीही मकर संक्रातीच्या सणाची ओळख आहे. या दिवशी झाले गेले सर्व विसरून लोक एकमेकांना तिळ गुळ घ्या आणि गोड-गोड बोला अशा शुभेच्छा देतात. तुम्ही देखील खालील Greetings, Quotes, HD Images शेअर करून तुमच्या प्रियजनांना मकर संक्रातीच्या खास मराठमोळ्या शुभेच्छा देऊ शकता. (हेही वाचा - Makar Sankranti 2024 Bornahan: बाळाचं बोरन्हाण कसं करतात? जाणून घ्या यंदाच्या तारखा आणि बोरन्हाण करण्याची पद्धत!)

येणारी मकर संक्रांत ही तुम्हाला तुमच्या आयुष्यात कोणतेही संकट न येता भरभरून यश घेऊ येवो ही सदिच्छा. तुम्हाला आणि तुमच्या परिवाराला

मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा!

Makar Sankranti 2024 Messages (फोटो सौजन्य - File Image)

तुमचे आयुष्य यावेळी सूर्याच्या किरणांप्रमाणेच

सुखाने आणि भरभराटीने भरून जावो.

मकर संक्रांत तुमच्या आयुष्यात आनंद घेऊन येवो

मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा!

Makar Sankranti 2024 Messages (फोटो सौजन्य - File Image)

हा सूर्योदय तुमच्या आयुष्यात

आशेची किरणे घेऊन येवो

हीच ईश्वरचरणी प्रार्थना.

मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा!

Makar Sankranti 2024 Messages (फोटो सौजन्य - File Image)

गोड नाती गोड सण

तुम्हाला मिळो खूप धन

आनंद ऐश्वर्य सुख समृद्धी

राहो तुमच्या अंगणी

तिळगुळ घ्या गोड गोड बोला

Makar Sankranti 2024 Messages (फोटो सौजन्य - File Image)

म…… मराठमोळा सण

क…… कणखर बाणा

र …… रंगीबिरंगी तिळगुळ

सं…… संगीतमय वातावरण

क्रा…… क्रांतीची मशाल…

त …… तळपणारे तेज

मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा!

Makar Sankranti 2024 Messages (फोटो सौजन्य - File Image)

यंदा 15 जानेवारीला पहाटे 2:54 वाजता सूर्य देव मकर राशीत प्रवेश करत आहे. त्यामुळे मकर संक्रांती सोमवार, 15 जानेवारी रोजी साजरी केली जाणार आहे. या दिवशी गंगा स्नान, पूजा, जप, तपश्चर्या आणि दान करण्याची परंपरा आहे.