स्त्रियांनाही शिक्षणाचा अधिकार मिळावा यासाठी प्रयत्न करुन स्त्री शिक्षणाची मुहूर्तमेढ ज्यांनी रोवली त्या महात्मा जोतिबा फुले यांची आज 129 वी पुण्यतिथी. या दिनाचे औचित्य साधून महाराष्ट्रातील अनेक दिग्गज नेत्यांनी ट्विटच्या माध्यमातून आदरांजली वाहिली. जोतिबा फुले यांचे मूळ गाव सातारा जिल्ह्यातील कटगुण हे होते. इथेच 11 एप्रिल 1827 रोजी त्यांचा जन्म झाला. स्त्रिया, दलित, कष्टकरी आणि शेतकरी यांच्यासाठी आपले जीवन व्यतीत केलेल्या महात्मा फुलेंचा मृत्यू 28 नोव्हेंबर 1890 रोजी पुण्यात झाला.
महाराष्ट्राचे ज्येष्ठ समाजसुधारक जोतिबा फुले यांच्या पुण्यतिथी निमित्त राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते शरद पवार, माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, राष्ट्रवादी काँग्रेस खासदार सुप्रिया सुळे, काँग्रेस नेत्या प्रियंका गांधी आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी ट्विट च्या माध्यमातून खास आदरांजली वाहिली.
सुप्रिया सुळे यांचे ट्विट:
शोषित समाजाच्या उत्थानासाठी आयुष्य वेचणारे थोर समाजसुधारक महात्मा जोतिबा फुले यांची आज पुण्यतिथि. यानिमित्ताने त्यांच्या स्मृतींना विनम्र अभिवादन...! pic.twitter.com/kqH5GEmHXT
— Supriya Sule (@supriya_sule) November 28, 2019
शरद पवार यांचे ट्विट:
समतेचे पुरस्कर्ते व धर्मव्यवस्थेच्या गुलामगिरीतून भारतीय समाजाला मुक्त करण्यासाठी क्रांतीची ज्योत पेटविणारे महात्मा जोतिबा फुले यांच्या स्मृतिदिनी त्यांना विनम्र अभिवादन! pic.twitter.com/OratdQvbHY
— Sharad Pawar (@PawarSpeaks) November 28, 2019
देवेंद्र फडणवीस यांचे ट्विट:
थोर सामाजिक कार्यकर्ते, क्रांतिसूर्य महिला शिक्षणासाठी पुढाकार घेणारे महात्मा जोतिबा फुले यांना स्मृतिदिनी भावपूर्ण आदरांजली.. pic.twitter.com/BTzIgCzGl6
— Devendra Fadnavis (@Dev_Fadnavis) November 28, 2019
नितीन गडकरी यांचे ट्विट:
महात्मा ज्योतिबा फुले जी की पुण्यतिथि पर विनम्र अभिवादन। pic.twitter.com/V200s4kusj
— Nitin Gadkari (@nitin_gadkari) November 28, 2019
प्रियंका गांधी यांचे ट्विट:
जिस चीज को सोचा और कहा- उसके लिए सामाजिक बदलाव के मिशन पर निकल पड़े। वंचित तबकों की शिक्षा के लिए महत्वपूर्ण रास्ते तैयार किए।भेदभाव की व्यवस्था पर कड़ा प्रहार किया।
महान नायक ज्योतिबा फुले को उनकी पुण्य तिथि पर शत शत नमन।#jyotibaphule pic.twitter.com/j8p38LEspM
— Priyanka Gandhi Vadra (@priyankagandhi) November 28, 2019
समाजातील विषमता नष्ट करणे व तळागाळातील समाजापर्यंत शिक्षण पोहचवणे हे सत्यशोधक समाजाचे ध्येय होते. शाहू महाराजांनीही सत्यशोधक चळवळीस पाठींबा दिला. सत्यशोधक समाजाने गुलामगिरीविरुद्ध आवाज उठविला आणि सामाजिक न्यायाची व सामाजिक पुनर्रचनेची मागणी केली. या समाजातर्फे पुरोहितांशिवाय विवाह लावण्यास सुरुवात केली. मराठीत मंगलाष्टके रचली. अशाप्रकारे आजचा हा आधुनिक भारत घडवण्यात महात्मा फुले, सावित्रीबाई फुले व सत्यशोधक चळवळीचा फार महत्वाचा वाटा आहे.