कोल्हापूर (Kolhapur) संस्थानचे शाहू म्हणजेच राजर्षी छत्रपती शाहू महाराज (Rajarshi Chhatrapati Shahu Maharaj) यांची आज जयंती! 26 जून 1874 साली जन्मलेले शाहू महाराज आजही दलित, बहुजन आणि मागासवर्गीयांसाठी आधारस्तंभ समजले जातात. ब्रिटीश राजसत्तेमध्ये सामान्य जनतेला न्याय मिळावा म्हणून त्यांनी प्रयत्नांची पराकाष्ठा केली. त्याकाळतही पुरोगामी विचारांचे पुरस्कर्ते असणार्या राजर्षी छत्रपती शाहू महाराजांनी शैक्षणिक, सामाजिक, आर्थिक स्तरावर काळाच्या पुढे जाऊन विचार केल्याने आणि त्यानुसार समजाची घडी बसवल्याने आजही जनसामान्यांमध्ये त्यांच्याबद्दल आदर आहे. त्यांच्या प्रेरणेने आजही महाराष्ट्रात अनेकजण काम करतात. त्यानिमित्त त्यांच्या महाराष्ट्रातील त्यांच्या विचारांचा पुरस्कार करणार्या तमाम जनतेला शुभेच्छा देण्यासाठी व्हॉट्सअॅप (WhatsApp Status), फेसबूकच्या स्टेट्सच्या (Facebook Status) माध्यमातून शाहू महाराज जयंतीच्या शुभेच्छा देण्यासाठी मराठमोळी शुभेच्छापत्र(Wishes) , मेसेजेस (Messages), ग्रिटिंग्स (Greetings) देऊन आजचा दिवस साजरा करताना त्यांचे विचारही पुढल्या पिढीपर्यंत पोहचवण्यासाठीप्रयत्न करायला विसरू नका. Shahu Maharaj Jayanti 2020 Images: राजर्षी शाहू महाराज यांच्या जयंती निमित्त Wishes, Messages, Whatsapp Status शेअर करून करा छत्रपती शाहूच्या स्मृतीस अभिवादन!
शाहू महाराजांचा जन्म हा कागल येथील घाटगे घराण्यात झाला. त्याचं मूळ नाव यशवंत असे होते. कोल्हापूर संस्थानचे चौथे शिवाजी महाराज यांचे निधन झाल्यानंतर त्यांच्या पत्नी आनंदीबाई यांनी 1884 झाली यशवंत यांना दत्तक घेतले आणि त्याचं नावं 'शाहू' असे ठेवले. पुढे त्यांच्या राज्याभिषेकानंतर 28 वर्षे ते कोल्हापूर संस्थानाचे राजे होते. Shahu Maharaj Birth Anniversary: समाजसुधारक आणि कोल्हापूरच्या भोसले घराण्याचे राजा शाहू महाराज यांच्याबद्दल याा खास गोष्टी .
राजर्षी शाहू महाराज जयंती शुभेच्छा
भटक्या, विमुक्त जमातींचे आधारस्तंभ
छत्रपती राजर्षी शाहू महाराज यांच्या
जयंती निमित्त अभिवादन!
लोकराजा शाहू महाराज यांना
जयंती निमित्त विनम्र अभिवादन
बहुजन समाजाला स्वाभिमानाचे नवं जीवन देणार्या
लोकराजा राजर्षी शाहू महाराज यांना मानाचा मुजरा!
समता, बंधुता यांची शिकवण देणारा
लोकराजा छत्रपती शाहू महाराज यांना
जयंती निमित्त त्रिवार अभिवादन
राजर्षी शाहूंनी कोल्हापूर संस्थानात संगीत, चित्रपट, चित्रकला, लोककला आणि कुस्ती या क्षेत्रांतील कलावंतांना राजाश्रय देऊन त्यांना प्रोत्साहन दिले. अनेक शाळा आणि शैक्षणिक वसतीगृह सुरू केली. यासोबतच समाजात आंतरजातीय व आंतरधर्मीय विवाहास, विधवा विवाहाला परवानगी मिळवून दिली समाजात अस्पृश्यता कमी करण्यासाठी त्यांनी विशेष कार्य हाती घेतले होते. देवदासी सारख्या अनेक अनिष्ट प्रथा बंद केल्या. त्यामुळे छत्रपती शाहू महाराज हे समाजात लोकराजा राजर्षी शाहू महाराज झाले.