![](https://mrst1.latestly.com/wp-content/uploads/2020/06/02-1-1-380x214.jpg)
Shahu Maharaj Jayanti 2020 Images: महाराष्ट्रातील करवीर तथा कोल्हापूर संस्थानचे प्रागतिक अधिपती आणि थोर समाजसुधारक राजर्षी शाहू महाराज (Shahu Maharaj) यांचा 26 जून हा जन्मदिवस. शाहू महाराज यांनी प्राथमिक शिक्षण, जातिभेद-निवारण, अस्पृश्यता-निवारण आदी सुधारणांचा पुरस्कार केला. राजर्षी शाहू महाराजांचा जन्म कागलच्या जहागीरदार घाटगे घराण्यात जयसिंगराव आणि राधाबाई ह्या दांपत्याच्या पोटी झाला. त्यांचे पूर्वाश्रमीचे नाव यशवंतराव असे होते.
शाहू महाराज चौथ्या शिवाजींच्या अकाली निधनानंतर कोल्हापूरच्या गादीवर दत्तक गेले. शाहू महाराजांनी इंग्रजी, संस्कृत, इतिहास, राज्यशास्त्र इ. विषयांचा अभ्यास केला होता. शाहू महाराजांनी जातीव्यवस्थेविरुद्ध लढा उभारून समाजात स्वातंत्र्य, समता, बंधुत्व आणि न्याय ही लोकशाही मूल्य रुजविली. त्यांच्या जयंती निमित्त Wishes, Messages, Whatsapp Status शेअर करून करून छत्रपती शाहूच्या स्मृतीस अभिवादन करा! (हेही वाचा - Pandharpur Wari 2020: विदर्भातून देवी रुक्मिणीची पालखी यंदाही जाणार पंढरपूरला; 425 वर्षांच्या परंपरेत पडणार नाही खंड!)
![](https://mrst1.latestly.com/wp-content/uploads/2020/06/05-1-3.jpg)
![](https://mrst1.latestly.com/wp-content/uploads/2020/06/02-1-1.jpg)
![](https://mrst1.latestly.com/wp-content/uploads/2020/06/04-4.jpg)
![](https://mrst1.latestly.com/wp-content/uploads/2020/06/01-2-3.jpg)
![](https://mrst1.latestly.com/wp-content/uploads/2020/06/03-2-3.jpg)
छत्रपती शाहू महारांनी अस्पृश्यतेबरोबरच जातिभेदाशी अखेरपर्यंत संघर्ष केला. त्यांनी 1918 मध्ये आंतरजातीय विवाहास कायदेशीर मान्यता दिली. याशिवाय त्यांनी बालविवाहास प्रतिबंध करून नोंदणी विवाहाचा कायदा जारी केला. तसेच घटस्फोटास व विधवापुनर्विवाहास कायदेशीर मान्यता दिली. त्यांनी मागासवर्गीय वर्गांतील मुलींना व स्त्रियांना मोफत शिक्षणाची सुविधा निर्माण केली.