भगत सिंह | (Photo Credits: File Image)

Valentine's Day or Black Day: सोशल मीडिया म्हणजे माहिती, अफवा आणि व्हायरल व्हिडिओ, बातम्यांचा महापूर. सोशल मीडियावर प्रसिद्ध होणाऱ्या विविध बातम्या किती खऱ्या आणि किती खोट्या यावर नेहमीच चर्चा होत असते. अखेर बराच पाठपुरावा केल्यानंतर, काही कागदपत्रं, अधिकृत संस्था, व्यक्ती यांची प्रतिक्रिया जाणून घेतल्यानंतर मग अखेर त्याचा पडताळा होतो. ती बातमी सत्य की असत्य यातील वास्तव बाहेर येते. आज (14 फेब्रुवारी) जगभरात साजरा होणाऱ्या व्हॅलेंटाईन डे बाबत आणि ब्लॅक डेबाबतही अशीच एक बातमी गेल्या अनेक वर्षांपासून अनेकांचा गोंधळ उडवत आहे. ही बातमी सांगते की, ब्रिटीश सरकारने भगत सिंह , सुखतेवह आणि राजगुरु या क्रांतिकारकांना 23 मार्च 1931 या दिवशी नव्हे तर, 14 फेब्रुवारी 1931 या दिवशी दिली होती. मात्र, इतिहासांच्या पानांमध्ये जेव्हा या वृत्तातील दाव्याचा शोध घेतला असता दुध का दुध आणि पाणी का पाणी होते आणि सत्य समोर येते. अखेर काय आहे हे सत्य? घ्या जाणून.

इतिहासांच्या पानातून मिळाले उत्तर असे की, भगत सिंह आणि त्यांच्या दोन सहकाऱ्यांना (सुखदेव, राजगुरु) 24 मार्च या दिवशी फाशी देण्याचा निर्णय घेण्यात आला होता. मात्र, ब्रिटीश सरकारने या तिघांनाही 23 मार्च या दिवशी अत्यंत गुप्त पद्धतीने फाशी दिले. फाशीचे वृत्त बाहेर आले तर, जनतेमध्ये असंतोष निर्माण होईल. त्यावर काबू मिळवणे सरकारला कठीण होईल, असा तत्कालीन ब्रिटीश सरकारचा विचार होता.

पाश्चमात्य संस्कृतीच्या अनुकरणावरुन वाद

दरम्यान, जगभरात व्हॅलेंटाईन डे 14 फेब्रुवारीलाच साजरा केला जातो. मात्र, बहुतांश भारतीय लोक हा दिवस साजरा करणे म्हणजे पाश्चिमात्य जीवनशैलीचे अनुकरण आहे, असे समजून त्यास विरोध करतात. व्हॅलेंटाईन डेला विरोध म्हणून या दिवशी 'मातृ-पितृ पूजन दिवस' साजरा करण्याचा विचार व्यक्त करतात. तसेच, काही लोक व्हायरल बातम्यांचा आधार घेत आजचा दिवस ब्लॅक डे म्हणून साजरा करावा असेही म्हणतात.

व्हॅलेंटाईन डे खरोखरच काळा दिवस?

गेल्या काही दिवसापासून व्हॅलेंटाईन डे या दिवसाचे औचित्य साधत व्हॅट्सअॅपवर एक मसेज व्हायरल होत आहे. यात 14 फेब्रुवारी 1931 या दिवशी ब्रिटीश सरकारने भगत सिंह, सुखदेव, राजगुरी यांना फाशी दिले होते. म्हणूनच आम्ही या दिवशी व्हॅलेंटाईन डे नव्हे तर, काळा दिवस साजरा करु असेही वाक्य या मेसेजमध्ये असल्याचे दिसते. मात्र, या बातमीतील सत्तता अशी की, सिंह, सुखदेव आणि बटुकेश्वर यांना 23 मार्च के 1931 या दिवशीच फाशी दिले होते. ()

सोशल मीडियातील वृत्तातील सत्यता

गेल्या काही वर्षांपासून सोशल मीडियात व्हॅलेंटाईन डेबाबत चर्चेत येणारी ही बातमी पाहीली असता 14 फेब्रुवारी या दिवशी भगत सिंह, सुखदेव, राजगुरु या तिघांना फाशी दिल्याचे सांगितले जाते. वेववेगळ्या माध्यमांतून अशाच आषयाच्या वेगेगळ्या बातम्या पसरवल्या जातात. मात्र, इथेही हे असत्य असल्याचेच पुढे येते. कारण, या तिघांनाही या दिवशी फाशी दिलेच नव्हते. मात्र, काही दाक्षिणात्य कट्टरवादी संघटनांचा दावा आहे की, या तिघांना 14 फेब्रुवारी 1931 या दिवशी फाशीची शिक्षा सुनावण्यात आली. आणि 23 मार्च या दिवशी त्याची अंमलबजावणी करण्यात आली.

दरम्यान, क्रांतिकारकांच्या फाशीचा आणि 14 फेब्रुवारीचा तसा अर्थाअर्थी काहीच संबंध नाही. या तिन्ही क्रांतिकारांना 14 फेब्रुवारी या दिवशी फाशी दिल्याचा कोणताही उल्लेख इतिहासात आढळत नाही. सरदार भगत सिंह आणि बटुकेश्वर दत्त यांना 8 एप्रिल 1929 या दिवशी दिल्ली येथे केंद्रीय विधानसभेत बॉम्ब फेकल्याच्या आरोपाखाली अटक करण्यात आली होती. दिल्लीत बॉम्ब फेकल्याच्या प्रकरणाच्या खटल्याची सुनावणी 7 मे 1929 या दिवशी सुरु झाली आणि 12 जून या दिवशी या तिघांना दोषी ठरवत लाहोर कारागृहात नेण्यात आले. भगत सिंह हे लाहोर प्रकरणातीलही आरोपी होते.