Sant Tukaram Maharaj Palkhi Prasthan 2024 Images: संत तुकाराम महाराजांच्या पालखी सोबत प्रस्थान ठेवणार्‍या वारकर्‍यांना शुभेच्छा देण्यासाठी WhatsApp Status, Facebook Messages!
Sant Tukaram Palkhi | File Image

Pandharpur Ashadhi Wari: आषाढी एकादशीला (Ashadhi Ekadashi) विठ्ठल-रूक्मिणीच्या दर्शनाला पायी वारी करत जाण्याचा अनुभव विलक्षण असतो. यंदा 17 जुलै दिवशी आषाढी एकादशी अर्थात देवशयनी एकादशी (Devshayani Ekadashi) साजरी केली जाणार आहे. या सोहळ्यासाठी देहू मधून निघणारी संत तुकारामांची पालखी आणि आळंदी मधून निघणारी ज्ञानोबा माऊलींची पालखी ही दोन मुख्य आकर्षणं असतात. यंदा संत तुकारामांची पालखी 28 जूनला प्रस्थान ठेवणार आहे. यंदा या पालखीचं 339 वे वर्ष आहे. 16 जुलैला तुकोबा रायांची पालखी पंढरपूरामध्ये पोहचणार आहे. त्यामुळे या पालखीसोबत प्रवास सुरू करणार्‍यांना WhatsApp Messages, Facebook Wishes, Greetings, Photos च्या माध्यमातून तुम्ही शुभेच्छा देऊ शकता तसेच त्यांच्या सुरक्षित प्रवासासाठी तुम्ही कामना करू शकता.

मजल दरमजल करत वारकरी मंडळी पंढरपूरच्या दिशेने प्रवास करतात. या प्रवासात टाळ- मृदुंगाच्या जयघोषात अत्यंत मंगलमय वातावरणामध्ये वारकरी मंडळी प्रवास करत असतात. महाराष्ट्राला वारीची जुनी परंपरा आहे. त्यामुळे त्याची क्रेझ केवळ वृद्धांना नाही तर अनेक तरूण मंडळींना देखील आहे. आजकाल डिजिटल माध्यमातूनही अनेक जण या वारीचा भाग होतात. नक्की वाचा: Sant Tukaram Maharaj Palkhi Yatra Marg 2024 Schedule: संत तुकाराम महाराजांची पालखी यंदा 28 जूनला ठेवणार प्रस्थान; पहा रिंगण, मुक्कामांच्या तारखांसह संपूर्ण वेळापत्रक! 

तुकाराम महाराजांच्या पालखी सोबत प्रस्थान ठेवणार्‍या वारकर्‍यांना शुभेच्छा

Sant Tukaram Palkhi | File Image
Sant Tukaram Palkhi | File Image
Sant Tukaram Palkhi | File Image
Sant Tukaram Palkhi | File Image
Sant Tukaram Palkhi | File Image

आषाढी एकादशीला पंढरपूरप्रमाणेच राज्यातील अनेक विठ्ठल-रूक्मिणीची मंदिरं गर्दीने फुललेली असतात. भाविक शक्य असेल तेथून आपली श्रद्धा अर्पण करतात. तर अनेकजण दिवसभराचा उपवास देखील ठेवतात.