
पंढरपूरच्या विठूरायाच्या आषाढी वारीसाठी (Pandharpur Wari 2025) जगदगुरु संत तुकाराम महाराज (Tukaram Maharaj) यांची पालखी येत्या 18 जून रोजी देहू येथून प्रस्थान ठेवणार आहे. तुकाराम महाराजांच्या पालखीचं यंदाचं 340 वं वर्ष आहे. श्री क्षेत्र देहू येथून पंढरपूर कडे वारकरी मजल दरमजल करत विठ्ठल-रूक्मिणीच्या दर्शनाला पोहचणार आहेत. दरवर्षी भाविक मोठ्या उत्साहाने टाळ,मृदुंगाच्या तालात डोलत मुखी विठू माऊलीचं नाव घेत वारी चालतात त्यामुळे यावारीचं एक विशेष आकर्षण असते. यंदा 6 जुलै 2025 दिवशी आषाढी एकादशीचा सोहळा रंगणार आहे. या खास दिनी विठूरायाचं दर्शन घेण्यासाठी मोठ्या संख्येने भाविक पंढरपूरात येतात.
तुकारामांच्या पालखीमध्ये 'रिंगण' हे विशेष आकर्षण असते. यामध्ये 'गोल रिंगण' आणि उभे रिंगण अशा दोन प्रकारचे रिंगण पाहता येतात. गोल रिंगणामध्ये पालखीभवती नागरिक मानवी साखळी करून फेर धरतात. त्यानंतर दोन मानाचे घोडे गोलाकार फिरतात मात्र यामध्ये एकच घोडेस्वार असतो. दुसर्या घोड्यावर संत तुकाराम स्वार असतात असा वारकर्यांचा विश्वास आहे. त्यानंतर या गोलाकार रिंगणाभोवतालची माती उचलण्यासाठी वाराकर्यांची गर्दी असते. त्यानंतर उभ्या रिंगणादरम्यान वारकरी सरळ रेषेत उभ्याने राहून उड्या मारतात. Ashadhi Wari 2025 Schedule: आषाढी वारी पालखी सोहळा कधी सुरू होणार? जाणून घ्या महत्त्वाचे अपडेट.
संत तुकाराम पालखी सोहळा कार्यक्रम
तुकाराम महाराजांच्या पालखीतील महत्त्वाचे दिवस
- पालखी प्रस्थान - 18 जून 2025
- पहिलं गोल रिंगण - 28 जून 2025 (बेलवंडी)
- दुसरं गोल रिंगण - 29 जून 2025 (इंदापूर)
- तिसरं गोल रिंगण - 1 जुलै 2025 (अकलूज माने विद्यालय)
- पहिलं उभं रिंगण - 2 जुलै 2025 (माळीनगर)
- दुसरं उभं रिंगण - 4 जुलै 2025 (बाजीराव विहीर)
- तिसरं उभं रिंगण - 5 जुलै 2025 (पादुका आरती)
6 जुलै आषाढी एकादशी दिवशी तुकाराम महाराजांची पालखी पंढरपूर मध्ये पोहचणार आहे. दरम्यान ही पालखी 10 जुलै पर्यंत पंढरपूरात असणार आहे. दुपार नंतर पालखीचा परतीचा प्रवास सुरू होणार आहे.