
Ashadhi Wari 2025 Schedule: महाराष्ट्रात आषाढी वारी सोहळा मोठ्या उत्साहात पार पडतो. यंदाच्या आषाढी यात्रेसाठी संत ज्ञानेश्वर महाराज (Saint Dnyaneshwar Maharaj Palkhi) आणि संत तुकाराम महाराजांच्या पालखीच्या (Saint Tukaram Maharaj Palkhi) प्रस्थानाची तारीख ठरली आहे. संत ज्ञानेश्वर आणि संत तुकाराम पालख्यांचे प्रस्थान कधी होणार याची तारीख जाहीर करण्यात आली आहे. परंतु, असं असलं तरी अद्याप पालखीचे वेळापत्रक (Ashadhi Wari 2025 Schedule) समोर आलेले नाही. तथापी, सासवडमध्ये संत ज्ञानेश्वरांची पालखी कधी येणार याबाबत माहिती समोर आली.
खरंतर सध्या पालखी मार्ग असलेल्या रस्त्यांवरील अतिक्रमण हटवण्याचे काम सुरू आहे, जेणेकरून पालखी मार्गावर वारकऱ्यांना कोणताही अडथळा येणार नाही. अशातचं आता सासवड -जेजूरी मार्गावरील अतिक्रमण हटवण्यात येत असून ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीसाठी रस्त्यांचे रुंदीकरण करण्यात येत आहे. (हेही वाचा -CM Fellowship Maharashtra 2025: मुख्यमंत्री फेलोशिप कार्यक्रम 2025-26 जाहीर; mahades.maharashtra.gov.in वर करा अर्ज)
संत ज्ञानेश्वर महाराज पालखी प्रस्थान सोहळा -
प्राप्त माहितीनुसार, संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीचे प्रस्थान 19 जून रोजी होणार आहे. तसेच संत तुकाराम महाराजांच्या पालखीचं प्रस्थान 18 जून रोजी पंढरपूरच्या दिशेने होणार आहे. पालख्यांच्या 17 मुक्कामानंतर पंढरपूरला पालखी सोहळा पोहोचेल.
आषाढी वारी सोहळा तारीख -
यंदा 6 जुलै रोजी पंढरपूरमध्ये आषाढी सोहळा पार पडेल. या सोहळ्यात राज्यभरातून वारकरी विठ्ठलाच्या दर्शनाला पंढरपूरात दाखल होतील. तथापी, आषाढी वारीच्या पार्श्वभूमीवर आळंदी देवस्थानने पालखी मार्गावरील विसावा ठिकाणं आणि मुक्कामाच्या ठिकाणांचा आढावा घेण्यास सुरुवात केली आहे. प्राप्त माहितीनुसार, संत ज्ञानेश्वर पालखी सोहळा 22 जूनला सासवडमध्ये पोहोचणार आहे. याठिकाणी पालखीचा मुक्काम होईल आणि त्यानंतर 24 जून रोजी संत ज्ञानेश्वर महाराजांची पालखी पंढरपूरच्या दिशेने प्रस्थान करेल.