
महाराष्ट्रामध्ये तरूणांना प्रशासकीय कामामध्ये सहभागी करत गतिमानता वाढवण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी "मुख्यमंत्री फेलोशिप कार्यक्रम" 2025-26 (CM Fellowship Maharashtra 2025) जाहीर केला आहे. या फेलोशीप मध्ये 60 जणांची निवड केली जाणार आहे. राज्यातील तरुणांना प्रशासनासोबत काम करण्याचा अनुभव मिळावा व त्या सोबतच त्यांच्या ज्ञानाच्या, अनुभवाच्या कक्षा रुंदावण्यास मदत व्हावी. तरुणांमधील कल्पकता व वेगळा विचार मांडण्याची क्षमता, उत्साह, तंत्रज्ञानाची आवड यांचा उपयोग प्रशासनास व्हावा या उद्देशातून ही फेलोशीप पुन्हा सुरू करण्यात आली आहे. दरम्यान यासाठी महाराष्ट्रातील तरूणांना ऑनलाईन अर्ज करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
"मुख्यमंत्री फेलोशिप कार्यक्रम" 2025-26 साठी कुठे कराल अर्ज?
इच्छुक उमेदवार mahades.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर ऑनलाईन अर्ज करू शकतात. हा सशुल्क अर्ज असून सोबत 500 रूपये भरावे लागणार आहेत. अधिक माहितीसाठी mahades.maharashtra.gov.in संकेतस्थळाला भेट देण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
पात्रता निकष
उमेदवार भारतीय असावा. तसेच त्याचे वय 21 ते 26 वर्ष असावं
किमान 60% सह कोणत्याही शाखेतील पदवीधर असावा
किमान 1 वर्षाचा पूर्णवेळ अनुभव आवश्यक
मराठी, हिंदी व इंग्रजी भाषांचे तसेच संगणक आणि इंटरनेट हाताळणीचे ज्ञान असावं
एका 100 गुणांच्या ऑनलाईन परीक्षेद्वारा 60 फेलोंची निवड केली जाणार आहे. निवड झालेल्या 60 जणांना राज्यात 20 निवडक जिल्ह्यांमध्ये नियुक्त केले जाईल. या फेलोंना जिल्हाधिकारी तर काहींना मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद यांच्या मार्गदर्शनाखाली काम करावे लागणार आहे.
दरम्यान 12 महिन्यांसाठी फेलोंना राज्य सरकार सोबत काम करता येणार आहे. यामध्ये फेलोंना दरमहा 56,100 रूपये मानधन आणि 5400 प्रवासखर्च दिला जाईल. म्हणजे एकूण स्टायपेंट मिळणार आहे.