
NMMC Recruitment 2025 Announced for Group C and Group D Posts: नवी मुंबई महानगरपालिकेकडून (Navi Mumbai Municipal Corporation) प्रशासकीय, अभियांज्ञिकी, तांत्रिक, वित्त, सार्वजनिक आरोग्य विभागात विविध पदांसाठी नोकरभरती जाहीर केली आहे. गट क आणि गट ड मध्ये सुमारे 620 जागांसाठी ही नोकरभरती होणार आहे. इच्छूक उमेदवार या नोकरभरतीमध्ये आज 28 मार्चपासून अर्ज करू शकणार आहेत. दरम्यान उमेदवारांकडे 11 मे 2025 पर्यंत अर्ज करण्यासाठी वेळ आहे. नवी मुंबई महानगरपालिकेमध्ये बायोमेडिकल इंजिनिअर, कनिष्ठ अभियंता पासून स्टाफ नर्स/नर्स मिडवाइफ, आहार तंत्रज्ञ अशा विविध पदांसाठी नोकरभरती होणार आहे.
नवी मुंबई महानगरपालिकेच्या नावे काही दिवसांपूर्वी खोटी नोकरभरतीची जाहिरात वायरल झाली होती त्यानंतर पालिका प्रशासनाने खोट्या जाहिरातांना बळी पडू नका असं आवाहनही केले होते. दरम्यान आता पालिकेने अधिकृत वेबसाईट द्वारा या नोकरभरतीची माहिती दिली आहे. त्यामुळे आता उमेदवार आपला अर्ज सुरक्षितपणे दाखल करू शकतात.
नवी मुंबई महानगरपालिकेच्या आस्थापनेवर 'गट-क' आणि 'गट - ड' मध्ये 30 संवर्गात 620 पदांकरिता सरळसेवेव्दारे भरती प्रक्रिया.
अधिक माहितीसाठी नमुंमपा अधिकृत संकेतस्थळ :- https://t.co/HvrcjFwCfU
#nmmcadmin #nmmcadmindepartment #nmmcbharti #vacancy #nmmcrecruitement pic.twitter.com/1LO4d3RjDi
— Navi Mumbai Municipal Corporation (@NMMConline) March 27, 2025
नवी मुंबई महानगर पालिका नोकर भरतीचे अपडेट्स
एकूण जागा - 620
अर्ज प्रक्रिया कालावधी - 28 मार्च 2025 ते 11 मे 2025
कुठे कराल अर्ज- www.nmmc.gov.in
. यासाठी परीक्षा घेतली जाणार आहे. मात्र इंटरव्ह्यू नसेल अशी माहिती देण्यात आली आहे. दरम्यान परीक्षा शुल्क खुला वर्गासाठी 1000 आणि राखीव वर्गासाठी 900 रूपये आहे.
अर्जदाराचे वय 1 जानेवारी 2025 रोजी 18-38 वर्षांच्या दरम्यान असणे आवश्यक आहे. सरकारी नियमांनुसार राखीव श्रेणीतील उमेदवारांना उच्च वयोमर्यादेत सूट लागू असणार आहे.