ज्येष्ठ महिना निम्मा उलटला की वारकर्यांना आपसूकच आषाढी वारीचे (Ashadi Ekadashi Wari) वेध लागतात. यंदा संत तुकाराम महाराजांची पालखी (Sant Tukaram Maharaj Palkhi) 28 जून दिवशी प्रस्थान ठेवणार आहे. जगद्गुरू संत तुकाराम महाराज यांच्या पालखीचे हे यंदाचे 339 वे वर्ष आहे. आषाढी वारी च्या निमित्ताने वारकरी मंडळी हळूहळू विठू नामाचा गजर करत मजल दर मजल करत पंढरपूरच्या दिशेने प्रवास करतात. पायी ही वारी करण्याचा अनुभव अदभूत असतो. ज्ञानोबा, तुकोबांसह अनेक संतांच्या पालख्या आषाढी वारी निमित्त पंढरपूरच्या दिशेने प्रवास करत असतात. मग यंदा तुकाराम महाराजांच्या पालखीचा सोहळा कसा आहे? कुठे कधी कसा मुक्काम आहे याचं सविस्तर वेळापत्रक तुम्ही देखील जाणून घ्या.
तुकोबा रायांची पालखी देहू मधून पंढरपूर कडे प्रस्थान करते. 28 जूनला ती ईनामदार साहेब वाडा, देहू येथून प्रस्थान ठेवणार आहे. 16 जुलैला ती पंढरपूरात दाखल होणार आहे. 17 जुलै दिवशी पंढरपूर मध्ये आषाढी एकादशीच्या सोहळ्याला भाविकांसह वारकरी मनोभावे विठ्ठल-रूक्मिणीची पूजा करतात. Sant Dnyaneshwar Palkhi Yatra Marg 2024 Schedule: संत ज्ञानेश्वर माऊलींची पालखी यंदा 29 जूनला ठेवणार प्रस्थान; पहा रिंगण, मुक्कामांच्या तारखांसह संपूर्ण वेळापत्रक!
तुकाराम महाराज पालखी सोहळा रिंगण तारखा
भेटीलागीं जीवा लागलीसे आस ।
शेकडो वर्षांची वैभवशाली परंपरा लाभलेल्या वारकरी संप्रदायाच्या आषाढीवारी निमित्त महाराष्ट्रातील लाखो वारकरी भाविक पंढरपूरकडे प्रस्थान करतात.
शुक्रवार, दिनांक २८ जून २०२४ रोजी जगद्गुरु संत तुकाराम महाराजांची पालखी श्री क्षेत्र देहू येथून प्रस्थान… pic.twitter.com/AEh4Iy7yAR
— Rupali Chakankar (@ChakankarSpeaks) June 25, 2024
तुकाराम महाराजांच्या पालखी सोहळ्यात गोल रिंगण 8 जुलैला बेलवाडी, 10 जुलैला इंदापूर, 12 जुलैला अकलूज, माने विद्यालय मध्ये होणार आहे. तर उभे रिंगण 13 जुलैला माळीनगर, 15 जुलैला बाजीराव विहीर, 16 जुलैला पंढरपूरला होणार आहे.