
यंदा आषाढी एकादशी (Ashadi Ekadashi) 17 जुलैला साजरी होणार आहे. या एकादशीसाठी पंढरपुरात विठ्ठल रूक्मिणी चं दर्शन घेण्यासाठी पायी वारी करत लाखो भक्त, वारकरी सहभागी होत असतात. त्यासाठी विशेष आयोजन केले जाते. यंदा संत ज्ञानेश्वर महाराज संस्थान कमिटी कडून जारी वेळापत्रकानुसार (Sant Dnyaneshwar Palkhi Yatra Marg Schedule) 29 जून 2024 दिवशी पालखी प्रस्थान ठेवणार आहे. हा ज्येष्ठ वद्य अष्टमी चा दिवस आहे. दरम्यान संत ज्ञानेश्वरांप्रमाणेच संत तुकोबा, मुक्ताबाई सह अन्य संतांच्या देखील पालखी प्रस्थान ठेवतात.
यात्रेचा पहिला मुक्काम आळंदीतील दर्शन मंडप बिल्डिंग येथे होईल. पालखी यात्रा 30 जून रोजी पुणे मुक्कामाकडे रवाना होणार असून 1 जुलैपर्यंत मुक्काम करणार आहे. त्यानुसार 2 जुलै रोजी मिरवणूक सासवडकडे रवाना होईल तेथे 3 जुलैपर्यंत मुक्काम असेल. पालखी सोहळ्याचे पुढील मुक्काम पुढीलप्रमाणे आहेत.
जेजुरी : 4 जुलै
वाल्हे : 5 जुलै
लोणंद : 6 व 7
तरडगाव : 8 जुलै
फलटण : 9 जुलै
बरड : 10 जुलै
नाटेपुते : 11 जुलै
माळशिरस : 12 जुलै
वेळापूर : 13 जुलै
भंडीशेगाव : 14 जुलै
वाखरी : 15 जुलै
पंढरपूर : 16 जुलै
ज्ञानेश्वर महाराज पालखी 2024 रिंगण तारखा
रिंगण हे आषाढी वारी मधील प्रमुख आकर्षण आहे. रिंगण, म्हणजे वर्तुळ ही अशी घटना आहे जिथे संताची पालखी मध्यभागी असते तर वारकरी भजन, भक्तिगीते सादर करण्यासाठी त्याच्याभोवती जमतात. 'माऊलीचा अश्व' नावाचा पवित्र घोडा जो संताचा आत्मा घेऊन जातो असे म्हटले जाते ते रिंगणभोवती धावतो.
चांदोबा लिंबा (पहिले रिंगण): 8 जुलै
पुरंदवडे (पहिली फेरी रिंगण): 12 जुलै
कुडूस फाटा (दुसरी फेरी रिंगण): 13 जुलै
ठाकूर बुवाची समाधी (तिसरे रिंगण, संत सोपानदेवांच्या मिरवणुकीने भेट): 14 जुलै
बाजीराव ची मिरवणूक दुसरे स्थायी रिंगण, चौथे फेरीचे रिंगण: 15 जुलै
पादुका (तिसरे स्थायी रिंगण): 16 जुलै
20 जुलैपर्यंत पालखी सह वारकरी पंढरपुरात राहणार आहेत. 21 जुलै रोजी चंद्रभागा नदी, गोपाळपूर काला आणि श्री रुक्मिणी भेट येथे पवित्र स्नान करून वारी परत येईल आणि पादुकाजवळ मुक्काम करेल.