संत ज्ञानेश्वर महाराजांनी (Sant Dnyaneshwar Maharaj) अवघ्या 21 व्या वर्षी संजीवन समाधी घेऊन आपली या इहलोकातील यात्रा संपवली होती. त्यामुळे माऊलींच्या भक्तांसाठी या दिवसाचं विशेष महत्त्व आहे. दरम्यान संत ज्ञानेश्वरांनी कार्तिक वद्य त्रयोदशी दिवशी समाधी घेतल्याने दरवर्षी आळंदी ला संत ज्ञानेश्वर महाराज संजीवन समाधी सोहळ्यानिमित्त (Sant Dnyaneshwar Samadhi Sohala) विशेष कार्यक्रमाचं आयोजन केले जाते. यंदा हा दिवस 2 डिसेंबर दिवशी आहे. या सोहळ्याचे यंदाचे 725 वे वर्ष असल्याने त्याचा अधिकच महत्त्व आहे. मग याच ज्ञानोबा माऊलीच्या संजीवन समाधी सोहळा निमित्त सोशल मीडीयात त्यांचे सकारात्मकता देणारे विचार Facebook Messages, WhatsApp Status, HD Images द्वारा शेअर करत या दिवसाची सुरूवात प्रेरणादायी करू शकतो.
कोरोना संकट आटोक्यात आल्याने यावर्षी आळंदी येथील कार्तिकी यात्रा सोहळ्याला प्रशासनाने देखील परवानगी दिली आहे. हा सोहळा आळंदीत 27 नोव्हेंबर ते 4 डिसेंबर (कार्तिक वद्य अष्टमी ते कार्तिक वद्य अमावास्या) या काळात पार पडणार आहे. संत ज्ञानेश्वर महाराजांच्या 725 व्या संजीवन समाधी दिनानिमित्त मोठ्या दिमाखात यंदाच्या सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. नक्की वाचा: संत ज्ञानेश्वर महाराजांच्या संजीवन समाधीवर अभिषेक ऐवजी आता केवळ महापूजा .
संत ज्ञानेश्वर यांचे सकारात्मक विचार
- ज्ञानी लोकांच्या सानिध्यात राहुनही मूर्ख लोक ज्ञान ग्रहण न करता त्यांच्यात वाईटच शोधत बसतात - संत ज्ञानेश्वर
- आज जरी यश, सुख, समृद्धी माझ्या पायाशी लोळण घेत असली, तरी उद्या किंवा कधीही नष्ट होऊ शकते याची सतत जाणीव ठेऊन, मी अहंकाराला दूर ठेवले पाहिजे. - संत ज्ञानेश्वर
- प्रयत्न न करता सहजपणे मिळेल अशी कोणतीही गोष्ट या भूतलावर अस्तित्त्वात नाही - संत ज्ञानेश्वर
- माझ्या आयुष्यात घडणाऱ्या घटना, परिस्थिती, यावर माझे अनेकदा नियंत्रण नसते. मात्र त्यावेळी सकारात्मक विचार अन् योग्य वर्तन नक्कीच माझ्या हाती आहे. - संत ज्ञानेश्वर
- भावेविण भक्ती, भक्तीवीण मुक्ती बळेवीण शक्ती बोलू नये - संत ज्ञानेश्वर
संत ज्ञानेश्वर महाराज संजीवन समाधी सोहळ्यानिमित्त पंढरपूर येथून श्री विठ्ठल पादुकांसह भक्त पुंडलिक आणि संत नामदेव यांच्या पादुका आळंदीत प्रस्थान करतात. आषाढी यात्रेच्या वेळी सर्व संतांच्या पादुका विठ्ठलाच्या चरणी दर्शनासाठी येतात. परंतु कार्तिकी वैद्य एकादशी आणि संत ज्ञानेश्वर महाराज यांच्या संजीवनी सोहळ्यानिमित्त विठ्ठल स्वत: उपस्थितीत राहतो असे मानले जाते. संत ज्ञानेश्वर हए भागवत संप्रदायाचे प्रवर्तक, योगी व तत्त्वज्ञ असल्याने त्यांचा केवळ वारकरी संप्रदायावरच नव्हे तर समस्त मनुष्यवर्गाला त्यांचे विचार, कार्य प्रेरणादायी आहे.