संत ज्ञानेश्वर महाराजांच्या संजीवन समाधीवर अभिषेक ऐवजी आता केवळ महापूजा; आजपासून निर्णय लागू
Dnyaneshwari Jayanti (Photo Credits: Wikimedia Commons)

आळंदी येथील संत ज्ञानेश्वर महाराजांच्या संजीवन समाधीवर आता अभिषेक आणि महापूजा होणार नसल्याचा निर्णय देवस्थान विश्वस्त मंडळाच्या बैठकीमध्ये घेण्यात आला आहे. दरम्यान आता अभिषेक आणि महापूजेऐवजी माऊलींच्या पादुकांचे पूजन केले जाईल असा निर्णय घेण्यात आला आहे. अभिषेकामुळे समाधीची झीज असल्याचं कारण पुढे करत नुकताच विश्वस्त मंडळाच्या बैठकीमध्ये निर्णय झाला आहे. दरम्यान आज (27 डिसेंबर) पासून त्याची अंमलबजावणी करण्यात येणार आहे.

संत ज्ञानेश्वरांच्या संजीवन समाधीवर अभिषेकामुळे आता त्याचं पूजन करण्याच्या निर्णयाला विरोध होण्याची शक्यता आहे. त्यामुळे देवस्थानाकडून पोलिस बंदोबस्त चोख करण्यात आला आहे. दरम्यान माऊलींच्या संजीवन समाधीचे जतन करण्याच्या दृष्टीने संवर्धन करण्यासाठी काही बदल करणं आवश्यक असल्याचं सांगितलं आहे. त्यानुसार आळंदी देवस्थानाच्या विश्वस्तांच्या बैठकीत निर्णय घेण्यात आला. यामध्ये पुरात्त्त्व विभागाने संजीवन समाधीची झीज होत असल्याचं म्हटलं आहे.

संत ज्ञानेश्वर महाराज संजीवन समाधीवर नियमित सकाळी 5 वाजल्यापासून अभिषेक करण्याला सुरूवात होते. दरम्यान मंदिराचा गाभारा हा 19 व्या शतकातील आहे. हा लहान असल्याने भाविकांना दर्शन घेण्यास अडचण निर्माण होते. परिणामी भाविक तासनतास रांगेत उभे असतात. तसेच पंचामृताच्या अभिषेकामुळे रासायनिक प्रक्रिया होऊन संजीवन समाधीची झीज होत आहे. त्यामुळे आता संजीवन समाधीऐवजी वारीमध्ये वापरण्यात येणार्‍या पादुकांची पूजा होते.