Shirdi Sai Baba Mandir(Photo Credit: Wikimedia Commons )

Guru Purnima 2019: आजचा दिवस म्हणजे गुरुशिष्यासाठी खास दिवस. गुरुंना वंदन करण्याचा दिवस म्हणजेच गुरुपौर्णिमा. ही गुरुपौर्णिमा (Guru Purnima) साईभक्तांसाठी विशेष मानली जाते. गुरुपौर्णिमेच्या दिवशी साईभक्त आपल्या लाडक्या साईंच्या दर्शनासाठी शिर्डीला जातात. कुणी त्यांना दत्ताचा अवतार मानतात तर कुणी विष्णूचा कुणी शिवाचा. बाबांच्या भक्त समुदायात सर्वच जातीधर्मांच्या लोकांचा समावेश होतो. यामध्ये प्रामुख्याने हिंदू व मुस्लिम धर्मीय आहेत. मुस्लिम धर्मातही सुफी संतांमध्ये साई बाबांना मानाचे स्थान आहे. म्हणूनच आजचा हा गुरुपौर्णिमेचा दिवस खास बनविण्यासाठी ऐका साईंची 5 भक्तिरसातील गाणी आणि भजने:

1. लिंबाखाली प्रगट झाला

2. साईबाबा आला साईबाबा आला

3. जो तो बोलू लागला साईबाबा

4. तुला खांद्यावर घेईन

5. साईंचा जोगवा मागेन

भक्तिरसाने न्हाऊन निघालेली ही गाणी आपल्याला साईचरणी लीन करतील. आज गुरुपौैर्णिमे दिवशी साईंना स्मरताना ही गाणी आपल्याला भक्तिमय करुन टाकतील. ही गाणी कशी वाटली आम्हाला जरूर कळवा आणि साईंना स्मरून आजची गुरुपौर्णिमा खास करा