Republic Day 2022 Speech in Marathi: प्रजासत्ताक दिनानिमित्त विद्यार्थी 'या' पद्धतीने करू शकतात भाषणाची तयारी; वाचा सविस्तर
Republic Day 2022 (फोटो सौजन्य - फाईल फोटो)

Republic Day 2022 Speech in Marathi: भारतात प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. या दिवशी नागरिक पहाटे उठून परेड पाहण्यासाठी आणि त्यांच्या सामाजिक कार्यक्रमात ध्वजारोहणात सहभागी होतात. यावर्षी बुधवारी, 26 जानेवारी 2022 रोजी देश आपला 73 वा प्रजासत्ताक दिन साजरा करणार आहे. 1950 मध्ये या दिवशी भारतीय राज्यघटना लागू झाली. प्रजासत्ताक दिनानिमित्त, शाळा आणि महाविद्यालये वादविवाद, भाषण, निबंध इत्यादी अनेक स्पर्धांसह कार्यक्रम आयोजित करतात. यावर्षी देखील विद्यार्थी हा कार्यक्रम साजरा करतील, म्हणून आम्ही येथे काही निबंध तसेच भाषणासाठी काही टिप्स देणार आहोत, ज्या तुम्ही या दिवशी वापरू शकता. (वाचा - Republic Day 2022 Office Decoration Ideas: झटपट करता येतील अशा प्रजासत्ताक दिनाच्या सजावटीसाठी काही सोप्या टिप्स)

भाषण/निबंधासाठी हे विषय निवडा -

भाषण -

सर्वांना नमस्कार,

आपल्या देशाचा 73 वा प्रजासत्ताक दिन साजरा करण्यासाठी आपण सर्वजण आज येथे जमलो आहोत. प्रजासत्ताक दिनी भाषण करण्यासाठी मला संधी मिळाली याचा मला अभिमान वाटतो. आपण सर्वच दरवर्षी प्रजासत्ताक दिन मोठ्या आनंदाने आणि अभिमानाने साजरा करतो. 1950 मध्ये या दिवशी भारतीय राज्यघटना लागू झाली. 15 ऑगस्ट 1947 रोजी भारताला स्वातंत्र्य मिळाले हे आपणा सर्वांना माहीत आहे, परंतु देशाला स्वतःचे कोणतेही संविधान नव्हते. तथापि, अनेक चर्चा आणि विचारांनंतर, डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या अध्यक्षतेखालील समितीने भारतीय संविधानाचा मसुदा सादर केला, जो 26 नोव्हेंबर 1949 रोजी स्वीकारला गेला आणि 26 जानेवारी 1950 रोजी तो अधिकृतपणे अंमलात आला.

26 जानेवारी हा दिवस आपल्या देशासाठी खूप महत्त्वाचा आहे. 1930 मध्ये या दिवशी भारतीय राष्ट्रीय काँग्रेसने लाहोर अधिवेशनात संपूर्ण स्वातंत्र्याची मागणी जाहीर केली. त्यानंतर 1950 मध्ये याच दिवशी भारत प्रजासत्ताक म्हणून अस्तित्वात आला. संविधानाच्या हस्तलिखित प्रतींवर संविधान सभेच्या सदस्यांनी जानेवारी 1950 मध्ये स्वाक्षरी केली आणि दोन दिवसांनी तो प्रजासत्ताक दिन म्हणून घोषित करण्यात आला.

भारत हा लोकशाही देश आहे. लोकशाही देशात राहणाऱ्या नागरिकांना देशाचे नेतृत्व करण्यासाठी त्यांचा नेता निवडण्याचा विशेषाधिकार आहे. आत्तापर्यंत बरीच सुधारणा झाली असली तरी आजही देशाला प्रदूषण, गरिबी, बेरोजगारी इत्यादी समस्या भेडसावत आहेत. आज आपण सर्वजण एकमेकांना वचन देऊ की, आपण स्वतः या सर्व समस्यांचे निराकरण करण्याचा प्रयत्न करू आणि आपल्या देशाचे वेगळे स्थान निर्माण करण्यात योगदान देऊ. धन्यवाद जय हिंद.