Republic Day 2022 Patriotic Songs: प्रजासत्ताक दिनी बॉलिवूडची 'ही' गाणी ऐकून तुमच्यातील देशभक्त होईल जागृत
Republic Day 2022 Patriotic Songs (Photo Credit - YouTube)

Republic Day 2022 Patriotic Songs: दरवर्षी 26 जानेवारीला प्रजासत्ताक दिन पूर्ण उत्साहात साजरा केला जातो. यावर्षी आपण 72 वा प्रजासत्ताक दिन साजरा करणार आहोत. ज्यामध्ये फक्त काही दिवस उरले आहेत. 26 जानेवारी रोजी भारत एक सार्वभौम प्रजासत्ताक बनला. 1947 मध्ये भारताला ब्रिटिशांपासून स्वातंत्र्य मिळाले, परंतु 26 जानेवारी 1950 पर्यंत राज्यघटना लागू झाली नाही. संविधान अंमलात आल्यानंतर भारत स्वतंत्र आणि सार्वभौम प्रजासत्ताक बनला. आपण भारतीय हा दिवस मोठ्या थाटामाटात आणि उत्साहाने साजरा करतो.

या दिवशी देशभरातील शाळा, महाविद्यालये, सरकारी कार्यालये ते सर्व सामान्य ठिकाणी तिरंगा फडकवला जातो. या विशेष प्रसंगी, दरवर्षी इंडिया गेट ते राष्ट्रपती भवनापर्यंत, राजपथावर एक भव्य परेड देखील आयोजित केली जाते. या परेडमध्ये भारतीय लष्कर, हवाई दल, नौदल इत्यादींच्या विविध रेजिमेंट्स भाग घेतात. भारताला स्वातंत्र्य मिळाल्यापासून अनेक क्रांतीकारकांच्या जीवनावर चित्रपट काढण्यात आले.

चित्रपटसृष्टी दीर्घ काळापासून देशभक्तीपर गाणी बनवत आहे. देशाप्रती असलेले प्रेम व्यक्त करण्यासाठी हे गाणे चांगला मार्ग आहेत. यावर्षी भारत आपला 73 वा प्रजासत्ताक दिन साजरा करत आहे. प्रजासत्ताक दिनानिमित्त काही देशभक्तीपर बॉलिवूड गाण्यांवर एक नजर टाकूया.

फिर भी दिल है हिंदुस्तानी (Phir Bhi Dil Hai Hindustani)

ये जो देस है तेरा (Yeh Jo Des Hai Tera)

संदेशे आते हैं (Sandese Aate Hai)

देस रंगीला (Des Rangila)

रंग दे बसंती (Rang De Basanti)

ऐसा देस है मेरा (Aisa Des Hai Mera)

जय हो (Jai Ho)

तेरी मिट्टी (Teri Mitti)

ऐ वतन (Ae Watan)

देशाप्रती असलेले प्रेम व्यक्त करताना देशभक्तीपर गाणे म्हणण्यापेक्षा दुसरा चांगला मार्ग नाही. वरील सर्व देशभक्तीपर गाणे ऐकून तुम्ही आपले देशाप्रती असलेले प्रेम व्यक्त करू शकता.