माघ महिन्यात शुक्ल सप्तमीचा दिवस रथ सप्तमी (Ratha Saptami) किंवा अचला सप्तमी (Achala Saptami) म्हणून साजरा केला जातो. यंदा ही रथ स्प्तमी 19 फेब्रुवारी 2021 दिवशी आहे. दरम्यान या दिवसाला आरोग्य सप्तमी म्हणून देखील ओळखलं जातं. रथ सप्तमीचा दिवस हा सूर्य देवाचा जन्मदिन म्हणून देखील ओळखला जातो. त्यामुळे या दिवशी सूर्य देवाची उपासना करण्याका विशेष महत्त्व आहे. महाराष्ट्रात मकर संक्रांतीपासून सुरू झालेला हळदी कुंकू कार्यक्रमांचा देखील रथ सप्तमी हा शेवटचा दिवस असतो. मग जाणून घ्या यंदाचा रथ सप्तमी तिथीची वेळ काय आहे? या दिवशी काय केले जातात तसेच पौराणिक कथांमध्ये रथ सप्तमीला विशेष काय महत्त्व आहे? Ratha Saptami 2021 Wishes: रथ सप्तमीच्या शुभेच्छा देण्यासाठी मराठी संदेश, WhatsApp Status, Facebook Messages शेअर करत साजरी करा सूर्य जयंती.
रथ सप्तमी तिथी तारीख आणि वेळ
यंदा रथ सप्तमी शुक्रवार 19 फेब्रुवारी दिवशी साजरी केली जाणार आहे. सप्तमी तिथीची सुरूवात 18 फेब्रुवारीला सकाळी 8 वाजून 17 मिनिटांनी होणार आहे तर समाप्ती 19 फेब्रुवारी दिवशी सकाळी 10 वाजून 58 मिनिटांनी होणार आहे.
रथ सप्तमी स्नान मुहूर्त
भारतामध्ये काही ठिकाणी रथ सप्तमीच्या दिवशी स्नान करण्याची पद्धत आहे. या करिता त्या दिवशी 5.14 मिनिटं ते 6.56 हा पहाटेचा वेळ शुभ आहे.
पौराणिक कथांनुसार, गणिका नावाची एक महिला होती तिने कधीच दान धर्म केला नव्हता. आयुष्याच्या उत्तरार्धामध्ये ती वशिष्ठ मुनींकडे गेली. त्यांना विचारलं मी कधीच दान धर्म केला नाही मला मोक्ष कसा मिळणार? त्यावर वशिष्ठमुनींनी तिला उत्तर दिले माघ महिन्यातील शुक्ल सप्तमीला दान कर. या दिवशी केलेले दान हे अन्य कोणत्याही दिवशी केलेल्या दानापेक्षा कित्येक पट अधिक पुण्यकारी आहे.
दरम्यान अचला सप्तमी म्हणजेच रथ सप्तमीच्या दिवशी सूर्यदेवाची उपासना करण्याची रीत आहे. यामुळे आयुष्यातील दु:ख, कष्ट कमी होण्यास मदत होते. सूर्यदेवाच्या उपासनेने आरोग्य सुधारते. अनेकजण या दिवशी नदी मध्ये डुबकी लावत सूर्यदेवाला जल आणि दीप दान करून त्याची आराधना करतात. (नक्की वाचा: Shiv Jayanti 2021 Date: 19 फेब्रुवारी दिवशी साजरी होणार शिवजयंती 2021; जाणून घ्या इतिहास आणि महत्त्व).
टीप: सदर लेख हा केवळ माहिती देण्याच्या उद्देशाने लिहला आहे. यामधील कोणत्याही गोष्टीची लेटेस्टली मराठी पुष्टी करत नाही.