हिंदू धर्मीयांसाठी माघ महिन्यात गणेश जयंती, वसंत पंचमी पाठोपाठ येणारा अजून एक महत्त्वाचा दिवस म्हणजे रथ सप्तमी (Ratha Saptami ). रथ सप्तमी हा दिवस अचला सप्तमी किंवा सूर्य जयंती म्हणून देखील ओळखला जातो. माघ शुक्ल सप्तमीचा हा दिवस सूर्यदेवाच्या जन्मदिनाचा सोहळा म्हणून साजरा करण्याची पद्धत आहे. मान्यतांनुसार या दिवसादिवसापासून सूर्यदेवाने संपूर्ण जगाला प्रकाशित करण्याला सुरूवात केली त्यामुळे रथ सप्तमीला विशेष महत्त्व आहे. मग या दिवसाच्या शुभेच्छा तुमच्या अप्तेष्टांना, नातेवाईकांना, मित्रमंडळींना सोशल मीडियात व्हॉट्सअॅप, हाईक, फेसबूक, ट्वीटर, इंस्टाग्राम याच्या माध्यमातून खास मराठमोळे मेसेजेस (Messages), स्टेटस (Status) याच्या माध्यमातून देऊन त्यांच्या दिवसाची खास सुरूवात करा. रथ सप्तमी हा मंगलमय दिवस प्रत्येकाच्या आयुष्यात आनंद, समृद्धी घेऊन येवो या कामनेसह या शुभ दिवसाची सुरूवात करा. Ratha Saptami 2021 Date: रथ सप्तमी यंदा 19 फेब्रुवारी दिवशी; जाणून घ्या या दिवसाचं महत्त्व, पूजा विधी.
रथ सप्तमीचा दिवस हा माघी सप्तमीचा दिवस आहे. या दिवशी सूर्यदेवाची आराधना करून व्रत केल्याने सार्या पापांमधून मुक्ती मिळते. त्यामुळे अनेक जण या दिवशी पवित्र नदी किंवा कुंडामध्येही डुबकी मारून सूर्यदेवाला अर्ध्य देतात. मग अशा या मंगलदायी दिवसाच्या शुभेच्छा देखील सोशल मीडियात शेअर करत तुम्ही आनंद द्विगुणित करू शकता.
रथ सप्तमीच्या शुभेच्छा
रथ सप्तमीला आरोग्य सप्तमी देखील म्हटलं जातं त्यामुळे सध्या कोविड 19 संकटाशी सामना करणार्या आपल्या सार्यांना सकारात्मकता देण्यासाठी ही रथ सप्तमी आवशय्क आहे. असं म्ह्टलं जात की रथ सप्तमी दिवशी सूर्योदयापूर्वी पवित्र पाण्याच्या कुंडात डुबकी मारल्यास आजारपणाचा धोका दूर होतो. सारे कष्ट हलके होतात. त्यामुळे चांगल्या आरोग्यासाठी प्रार्थना करायला आजचा सूर्य जयंतीचा दिवस गमवू नका.