![](https://mrst1.latestly.com/wp-content/uploads/2020/06/02-2-380x214.jpg)
Rani Lakshmi Bai Death Anniversary 2020 Images: भारताच्या स्वातंत्र्यसंग्रामात झाशीची राणी लक्ष्मीबाई (Rani Lakshmi Bai) यांचे महत्त्वपूर्ण योगदान आहे. राणी लक्ष्मीबाईंनी शौर्य-धैर्य यांचे अलौकिक प्रदर्शन करत इंग्रजी सत्तेला आव्हान दिले होते. या शुर राणीची आज पुण्यतिथी सर्वत्र साजरी होत आहे. राणी लक्ष्मीबाई यांच्या शौर्यामुळे त्यांना ‘क्रांतिकारकांची स्फूर्तिदेवता’ असंही म्हटलं जातं.
लक्ष्मीबाईंचे मूळ नाव मनिकर्णिका होते. त्यांचे वडील मोरोपंत तांबे हे पुण्याच्या पेशव्यांच्या आश्रयाला होते. तांबे कुटुंब मूळचे सातारा जिल्ह्यातील धावडशी गावचे होते. लक्ष्मीबाईंचा जन्म भागीरथी बाई यांच्या पोटी उत्तर प्रदेशातील काशी येथे झाला होता. लक्ष्मीबाई गंगाधरराव नेवाळकर म्हणजेच झाशीची राणी लक्ष्मीबाई 18 जून 1858 मध्ये ब्रिटिश सैन्याशी लढताना धारातिर्थी पडल्या. आज त्यांचा स्मृतिदिन आहे. राणी लक्ष्मीबाई यांच्या पुण्यतिथी निमित्त आपल्या मित्र-मैत्रिणींना Whatsapp Status, HD Images च्या माध्यमातून शेअर करुन मणिकर्णिकाला त्रिवार अभिवादन नक्की करा! (हेही वाचा -Jijabai Death Anniversary 2020: राजमाता जिजाबाई यांच्या पुण्यतिथी निमित्त जाणून घ्या त्यांच्या जीवनातील रोचक गोष्टी)
![](https://mrst1.latestly.com/wp-content/uploads/2020/06/01-2.jpg)
![](https://mrst1.latestly.com/wp-content/uploads/2020/06/02-2.jpg)
![](https://mrst1.latestly.com/wp-content/uploads/2020/06/03-2.jpg)
![](https://mrst1.latestly.com/wp-content/uploads/2020/06/04-3.jpg)
![](https://mrst1.latestly.com/wp-content/uploads/2020/06/05-2.jpg)
![](https://mrst1.latestly.com/wp-content/uploads/2020/06/06-1.jpg)
युद्धशास्त्रनिपुण, शूर आणि थोर कर्तृत्व व नेतृत्व असणाऱ्या राणी लक्ष्मीबाई जन्मतः कोणत्याही राजघराण्यातील नसल्या तरी राजघराण्याशी संबंधित व्यक्तींमध्ये वावरलेल्या, वाढलेल्या होत्या. इ.स. 1842 मध्ये त्यांचा विवाह झाशी संस्थानाचे राजे गंगाधरराव नेवाळकर यांच्याशी झाला. सासरी आल्यानंतर मणिकर्णिकेचे नाव बदलून लक्ष्मी असे ठेवण्यात आले. गंगाधरराव यांच्या निधनानंतर राणी लक्ष्मीबाई यांनी स्वत: झाशीची जबाबदारी स्विकारली. राणी लक्ष्मीबाई यांचे कार्य लक्षात घेता ब्रिटिशांनी त्यांचा उल्लेख 'हिंदुस्थानची जोन ऑफ आर्क' असा केला.