सध्या रमजानचा (Ramadan) पवित्र महिना सुरू आहे. यावेळी कोरोना संसर्गामुळे संपूर्ण देशात सामुदायिक प्रार्थना बंद करण्यात आली आहे. अशा परिस्थितीत लोक घरात राहूनच अल्लाहची इबादत करत आहेत. या पवित्र महिन्यात इस्लामवर विश्वास ठेवणारे लोक नियमितपणे नमाज अदा करतात, संपूर्ण महिनाभर रोजा म्हणजेच उपवास ठेवतात व रमजान महिन्याच्या शेवटच्या दिवशी ‘ईद’ साजरी केली जाते. रमजानच्या पाक महिन्यात, सकाळी 'सेहरी' (Sehri) पासून रोजा सुरु होतो व संध्याकाळी इफ्तार (Iftar) सह तो सोडला जातो. यावेळी खजुराला विशेष महत्व आहे. सध्या लॉक डाऊनमुळे सर्वजणच घरी आहेत, अशावेळी जाणून घ्या उद्या म्हणजे 17 मे साठी राज्यातील विविध शहरांमध्ये सेहरी आणि इफ्तारच्या वेळा नक्क्की काय आहेत.
> मुंबई -
सेहरी वेळ - 04:43
इफ्तार वेळ - 07:07
> पुणे -
सेहरी वेळ - 04:40
इफ्तार वेळ - 07:06
> कोल्हापूर -
सेहरी वेळ - 04:43
इफ्तार वेळ - 07:01
> औरंगाबाद -
सेहरी वेळ - 04:31
इफ्तार वेळ - 07:02
> नागपूर -
सेहरी वेळ - 04:13
इफ्तार वेळ - 06:48
> नाशिक -
सेहरी वेळ - 04:37
इफ्तार वेळ - 07:08
दरम्यान, रोजाचा अर्थ फक्त भुकेलेला आणि तहानलेला राहणे असा नाही, तर या काळात डोळे, कान आणि जीभ देखील उपवास करतात. याचा अर्थ- वाईट पाहू नका, वाईट ऐकू नका किंवा वाईट बोलू नका. खजूर, सुकामेवा, शेवया, दूध यांबरोबरच चिकन, अंडी यांसारखे पदार्थ या काळात प्रामुख्याने खाल्ले जातात. रमजानच्या महिन्यामध्ये जकात देणे, कुरान वाचणे, नमाज पढणे अशी कामे करून अल्लाहला प्रसन्न केले जाते. या महिन्यात जास्तीत जास्त सत्कृत्य करावे असे सांगितले आहे.
(हेही वाचा: 30 मे नंतर राज्यातील कोरोना विषाणूची परिस्थिती पाहून आषाढी वारीबद्दल निर्णय घेतला जाईल- उपमुख्यमंत्री अजित पवार)
अशाप्रकारे रमजान हा अत्यंत पवित्र, समाजाचे कल्याण करणारा, सहसंवेदना जागवणारा, सुख-शांती-समाधानाचा संदेश देणारा, वाईट कर्मांपासून दूर ठेवणारा, दानधर्माचे महत्त्व अधोरेखित करणारा रमझानचा महिना आणि ईद-उल-फित्रचा सण आहे.