Ramabai Ambedkar Jayanti Wishes 2023: रमाबाई आंबेडकर यांचा जीवन संघर्ष आजही प्रेरणादायी; जयंतीनिमित्त अनेकांकडून अभिवादन
(Ramabai Ambedkar- फोटो सौजन्य - wikimedia commons)

डॉ. बाबासाहेब भीमराव आंबेडकर (Dr. Babasaheb Ambedkar) यांच्या पत्नी रमाबाई आंबेडकर (Ramabai Ambedkar Jayanti 2023) यांची आज जयंती. रमाबाई आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त आंबेडकरी अनुयायी त्यांना अभीवदन (Ramabai Ambedkar Jayanti Wishes 2023) करत आहेत. रमाबाई भीमराव आंबेडकर यांचा जन्म 7 फेब्रुवारी1898 रोजी एका गरीब दलित कुटुंबात झाला. महाराष्ट्रातील दाभोळ या छोट्याशा गावात जन्मलेल्या रमाबाई आंबेदार यांना रमाई किंवा माता रमा म्हणूनही ओळखले जाते. पत्नी असल्यामुळे रमाबाई या डॉ. आंबेडकर यांच्या अनेक निर्णय आणि घटनांच्या साक्षीदार राहिल्या आहेत. डॉ. आंबेडकर यांच्या कार्यात त्यांनी अमुलाग्र योगदान दिले. त्यांना विदेशी शिक्षणासाठीही त्यांनी मोठी मदत केली. शिवाय आंबेडकर यांनी केलेल्या सामाजिक आणि न्याय्य सुधारणांसाठी केवळ पाठिंबाच नव्हे तर सक्रीय सहभागही त्यांनी नोंदवला. रमाबाई भीमराव आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त जाणून घ्या अधिक माहिती.

रमाबाई भीमराव आंबेडकर यांच्या वडिलांचे नाव भिकू धात्रे आणि आईचे नाव रुक्मिणी होते. रमाबाई यांचे वडील पोर्टर म्हणून काम करत होते. एकूण मासिक उत्पन्न आणि तत्कालीन समाजव्यवस्था आदी कारणांमुळे मुले आणि कुटुंबाचा सांभाळ करतानान रमाबाईंच्या वडीलांची ओढताण होत असे. त्यामुळे त्यांनी दाभोळ बंदरावरुन मासळी वाहण्याचे काम करुन कुटुंबाचा उदरनिर्वाह चालवला. (हेही वाचा, Ramabai Ambedkar Anniversary 2023: रमाबाई आंबेडकर जयंती निमित्त मान्यवरांकडून अभिवादन)

दरम्यान, रमाबाई लहान असतानाच त्यांच्या वडीलांचे निधन झाले. वडिलांचे छत्र हरवल्याने रमाबाई आणि त्यांची भावंडे उघड्यावर पडली. रमाबाई यांना गोराबाई, मीराबाई आणि शंकर अशी तीन भावंडे. या सर्वांना त्यांच्या काकांनी मुंबईत आणले आणि वाढवले. पुढे 1906 मध्ये रमाबाई आणि बाबासाहेब आंबेडकर यांचा विवाह झाला. लग्नाच्या वेळी रमाबाई आंबेडकर नऊ वर्षांच्या तर बाबा साहेब 15 वर्षांचे होते. रमाबाई आपल्या पतींना म्हणजेच आंबेडकरांना साहेब म्हणत असत तर आंबेडकर रमाबाई यांना रामू म्हणत असत.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्यावरही पत्नी रमाबाईंचा प्रभाव होता. जो डॉ. आंबेडरांनी 'थॉट्स ऑफ पाकिस्तान' नावाच्या एका पुस्तकातही मान्य केला आहे. डॉ. आंबेडकरांचे ध्येय पूर्ण होण्यासाठी रमाबाईंनीपूर्ण पाठिंबा दिला. त्यांनी कौटुंबीक अडचणींचा कोणताच पाढा वाचला नाही. कधी कुरकुर केली नाही. घरातील अडी-अडचणी त्यांनी आंबेकरांपर्यंत पोहोचूही दिल्या नाहीत.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि रमाबाई यांना एक मुलगी आणि चार मुलगे झाले. मुलीचे नाव इंदू तर मुलांची नावे (यशवंत, गंगाधर, रमेश आणि राजरत्न अशी होती. दरम्यान, यशवंतचा अपवाद वगळता बाकिची त्यांची चारही मुले दगावली. लग्नाला 29 वर्षे पूर्ण होताना रमाबाई यांचे 26 मे 1935 रोजी निधन झाले.