Ramabai Ambedkar Birth Anniversary 2023: डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पत्नी रमाबाई आंबेडकर यांची आज जयंती. त्यांच्या जयंतीनिमित्त देशभरात विविध ठिकाणी कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. दरम्यान, विविध क्षेत्रातील मान्यवरांनी रमाबाई आंबेडकर यांना अभिवादन केले आहे. रमाबाई आंबेडकर यांचा जन्म 7 फेब्रुवारी 1898 रोजी एका निम्नवर्गीय दलित कुटुंबात झाला. पुढे त्यांचा विवाह डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्याशी झाला. त्यांना रमाई किंवा आई रमा म्हणून ओळखले जाते. आज त्यांच्या जयंती निमित्त मान्यवरांकडून अभिवादन करण्यात आले आहे.
सुप्रिया सुळे
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पत्नी, त्यागमूर्ती माता रमाबाई आंबेडकर यांची आज जयंती. वंचितांच्या हक्कांसाठी लढणाऱ्या बाबासाहेबांच्या पाठीशी खंबीरपणे उभ्या राहिल्या.बाबासाहेबांची प्रेरणा,स्फुर्ती आणि लढण्याची उर्मी रमाईंचा त्यागच होता. महान त्यागमूर्तीस विनम्र अभिवादन! pic.twitter.com/LJH9dIc1xQ
— Supriya Sule (@supriya_sule) February 7, 2023
पंकजा मुंडे
त्यागमुर्ती रमाबाई आंबेडकर यांना जयंतीदिनी विनम्र अभिवादन !!#RamabaiAmbedkar pic.twitter.com/GDzQb3k5Nu
— Pankaja Gopinath Munde (@Pankajamunde) February 7, 2023
जितेंद्र आव्हाड
आज रमाबाई आंबेडकर यांची जयंती...
एका प्रसंगी बाबासाहेबांच्या सत्कार समारंभात रमाईला नेसायला लुगडे नव्हते तेव्हा रमाईने बाबासाहेबांचा फेटा लुगडे म्हणून घातला
खरंच त्यांनी अपार कष्ट सोसले म्हणूनच बाबासाहेबांना शून्यातून बहुजनांचे हे समृद्ध विश्व निर्माण करता आले.
कोटी कोटी प्रणाम pic.twitter.com/YRqypLBki4
— Dr.Jitendra Awhad (@Awhadspeaks) February 7, 2023
धिरज देशमुख
ज्यांचे जीवनकार्य अत्यंत प्रेरणादायी आहे अशा भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पत्नी रमाबाई आंबेडकर यांची आज जयंती. या अत्यंत धाडसी, कणखर व महान त्यागमूर्तीस विनम्र अभिवादन!#RamabaiAmbedkar pic.twitter.com/Qrfgd0UYde
— Dhiraj V Deshmukh (@MeDeshmukh) February 7, 2023
महाराष्ट्र युथ काँग्रेस
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या ध्येयाला निर्धाराचे बळ देणार्या, उपेक्षितांसाठी मायेची सावली असणाऱ्या त्यागमूर्ती माता रमाबाई आंबेडकर यांना जयंती दिनी विनम्र अभिवादन.#RamabaiAmbedkar pic.twitter.com/QDK4gHmp6D
— Maharashtra Youth Congress (@IYCMaha) February 7, 2023