देशभरात उद्या 3 ऑगस्ट रोजी रक्षा बंंधनाचा (Raksha Bandhan) पवित्र सण साजरा होणार आहे. श्रावण महिना सुरु होताच सुरु होणार्या सणांंच्या मंदियाळीतील हा दुसरा मोठा सण आहे. भावाबहिणीच्या प्रेमाचं, आपुलकीचं, नातं साजरं करण्यासाठी हा दिवस असतो. यंंदा हिंंदु कालदर्शिकेनुसार रक्षा बंंधन हे श्रावण पोर्णिमा म्हणजेच नारळी पोर्णिमेला साजरे होणार आहे. योगायोगाने या वर्षी हा सण श्रावणी सोमवारी येत आहे. श्रावण सोमवार (Shravani Somvar) हा प्रभु शंंकराची उपासना करण्याचा दिन असतो त्यामुळे यंंदा आपल्या भावासोबतच भगवान शंकराला सुद्धा आपण राखी अर्पण करुन आशिर्वाद घेऊ शकता. वास्तविक हा संपुर्ण दिवस खास असतो पण त्यातही राखी बांंधताना मुहुर्त पाहिल्यास सुवर्ण योग आपण जुळवुन आणु शकता. यासाठीच यंदाच्या रक्षा बंंधन दिनी राखी बांधण्यासाठी कोणता शुभ मुहुर्त आहे हे जाणुन घेउयात.
रक्षा बंंधन तिथी
राखी पोर्णिमा तिथि प्रारंभ: ऑगस्ट 2, 2020 ,21:31:02 पासुन
राखी पोर्णिमा तिथि समाप्त: ऑगस्ट 3, 2020 , 21:30:28 पर्यंत
राखी बांधण्याचा शुभ मुहूर्त
राखी बांधण्याचा मुहूर्त: दुपारी 1.16 ते संध्याकाळी 4.24
राखी बांधण्याचा प्रदोष मुहूर्त: संध्याकाळी 7.07 ते रात्री 9.15
राखी बांधण्याची योग्य पद्धत
-राखी चे तबक तयार करताना त्यात हळद-कुंकु, दिवा,तांदुळ आणि राखी घ्या.
- भावाला करंगळीच्या बाजुच्या बोटाने टिळा लावा. व त्याटिळ्यावर तांदळाच्या अक्षता लावा. याने सकारात्मक ऊर्जेचा संचार होतो.
- शक्य असल्यास सोन्याच्या किंवा चांदिच्या अंगठी किंवा नाण्याने भावाला ओवाळा. ओवाळताना डावी कडुन उजवीकडे ओवाळा.
- भावाच्या उजव्या मनगटावर राखी बांधा. व गोड खाऊ घाला.
-राखी बांंधताना "येन बद्धो बलिराजा, दानवेन्द्रो महाबलः तेनत्वाम प्रति बद्धनामि रक्षे, माचल-माचल" हा मंत्र म्हणा
दरम्यान, यंदा कोरोनामुळे तुम्ही तुमच्या बहीण भावाला भेटु शकत नसाल तर व्हिडिओ कॉलच्या माध्यमातुन रक्षाबंधन करण्याचा विचार करु शकता, अखेरीस प्रेम महत्वाचं, हो ना? तुम्हाला सर्वांना रक्षा बंंधन सणाच्या शुभेच्छा!